15 December 2024 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

देश कोरोना संकटाशी झुंजत आहे आणि भाजप सरकार पाडण्यात व्यस्त, शिवसेनेची टीका

Saamana Shivsena, BJP Party, Rajasthan political crisis, Sachin Pilot

मुंबई, १४ जुलै : ‘देश कोरोना संकटाशी झुंजत असताना भारतीय जनता पक्षाने काही वेगळेच उपद्व्याप सुरू केले आहेत. या काळात भाजपने मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले. आता जिभेला लागलेले हे रक्त पचण्याआधीच राजस्थानातील गेहलोत सरकार पाडून ढेकर देण्याच्या स्थितीत भाजप दिसत आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

‘विरोधकांची सरकारे अस्थिर करायची या सूत्राने केंद्रीय सत्ता काम करीत आहे. देशापुढे कोरोनाने कोसळलेली अर्थव्यवस्था, लडाखमधील चिनी घुसखोरी असे अनेक प्रश्न आहेत. लडाख सीमेवरील आपल्या 20 सैनिकांचे सांडलेले रक्त अजून ताजे आहे. हे सर्व प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला, काँगेसच्या अंतर्गत भांडणात टांग टाकून घोडेबाजारास उत्तेजन देण्याचे काम राजस्थानात सुरू आहे. वाळवंटात राजकीय उपद्व्याप करून वादळ निर्माण करून भाजप काय साध्य करणार आहे? अशाने संसदीय लोकशाहीचे वाळवंट होईल. भाजपकडे देशाची संपूर्ण सत्ता आहे. काही घरे त्यांनी विरोधकांसाठी सोडायला हवीत. यातच लोकशाहीची शान आहे,’ अशी भूमिकाही शिवसेनेनं मांडली आहे.

मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया २२ आमदारांसह भाजपमध्ये विलीन झाले. बक्षीस म्हणून सिंधिया यांना राज्यसभा मिळाली. भविष्यात ते मंत्रीही होतील. मध्य प्रदेशातील घास गिळंकृत करण्यात आला तेव्हा लोकांना खात्री होती की पुढचा नंबह राजस्थानचा असेल. तेथील उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे ज्योतिरादित्य सिंधियाच्या मार्गावर जातील, असे पैजा लावून सांगितले गेले. हे खरे असल्याचे दिसते.

सचिन पायलट राजस्थानमध्ये ३० आमदारांसह बंड केल्याची बोंब आहे. पण हा आकडा फुगवलेला आहे. २०० सदस्यांच्या राज्यस्थान विधानसभेत कॉंग्रेसचे १०७ आणि भाजपचे ७२ आमदार आहेत. अपक्ष व इतर आमदारही सरकारसमवेत होते. त्यातील काही परंपरेनुसार कुंपणावर बसले आहेत.

पायलट यांचा दावा आहे की, आता कॉंग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. पायलट जरी खरे असले तरी सरकारचे भवितव्य विधानसभेत ठरवले जाईल. विधिमंडळ पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बोलावलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत दहा ते बारा समर्थक पायलट आमदारही उपस्थित होते. त्यामुळे विधानसभेतील वास्तविक संख्या कळू शकेल. जोपर्यंत आमदारांची प्रमुख मोजणी केली जात नाही, भारतीय जनता पक्ष उघडपणे काही करणार नाही. परंतु सरकारला अस्थिर करण्यासाठी त्यांचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागे सुरु आहे.

 

News English Summary: While the country is grappling with the Corona crisis, the Bharatiya Janata Party (BJP) has launched a few different initiatives. During this period, the BJP overthrew the Congress’ Kamal Nath government in Madhya Pradesh.

News English Title: Saamana Shivsena attack on BJP Party over Rajasthan political crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x