24 November 2020 3:00 PM
अँप डाउनलोड

इन्कम टॅक्स, ED आणि CBI हे भाजपचे वकील, सत्ता पालट करण्यासाठी वापर - काँग्रेस

Income Tax, ED, CBI, BJPs lawyers, Congress party, Rajasthan

जयपूर, १३ जुलै : कर्नाटक, मध्य प्रदेशात सत्तांतर घडवून आणल्यानंतर आता भाजपने राजस्थानकडे आपला मोर्चा वळवला आहे. राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट पक्षावर नाराज आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे सचिन पायलट काँग्रेसपासून दूर जाण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक हादरा बसण्याची शक्यता आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राजस्थानमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत आहे. अशातच काँग्रेसकडे असलेल्या आमदारांपैकी जवळपास ३० आमदार हे पायलट गटाचे असल्याची माहिती आहे. त्यामुळे सचिन पायलट यांनी वेगळी भूमिका घेतल्यास काँग्रेस सरकार कोलमडणार हे निश्चित आहे.

“मी स्वत: सचिन पायलट यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना अनेक संदेश पाठवले. पण त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. ते पक्षापेक्षा मोठे नाहीत. पक्ष त्यांचे म्हणणे ऐकायला तयार आहे. पण बेशिस्त खपवून घेणार नाही. ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहतील अशी मला अपेक्षा आहे” असे अविनाश पांडे म्हणाले. ते राजस्थान काँग्रेसचे प्रभारी आहेत.

दरम्यान, राजस्थामधील काँग्रेस नेत्यांच्या घरांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्याने काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “इन्कम टॅक्स, ED आणि CBI हे भाजपचे वकील आहेत, आयकर विभागाने जयपूरमध्ये धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. ईडी कधी येणार? असं ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

 

News English Summary: Income Tax, ED and CBI are the BJP’s lawyers, the Income Tax Department has started raiding Jaipur. When will the ED come? Anger is expressed by tweeting like this.

News English Title: Income Tax ED and CBI are the BJPs lawyers allegations made by congress party after Rajasthan political crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(422)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x