30 November 2023 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर शेअरने 5 दिवसांत दिला 22 टक्के परतावा, पैसा वेगात वाढतोय Gold Rate Today | अरे देवा! आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचा दर किती महाग होणार? Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करतोय, 10 महिन्यांत दिला 150% परतावा, शेअरची किंमत उच्चांकी पातळीवर Aster DM Share Price | 1 दिवसात 20 टक्के परतावा देणाऱ्या एस्टर डीएम हेल्थकेअर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नेमकं कारण काय? OK Play Share Price | मल्टिबॅगर शेअर! ओके प्ले इंडिया शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील सेव्ह करा 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! पगारात होणार मोठी वाढ, आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाचे अपडेट BHEL Share Price | सरकारी कंपनीचा भरवशाचा शेअर! भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअर्स अप्पर सर्किटवर, फायदा घेणार?
x

सत्तेचा माज? भाजप कार्यकर्त्यांनी धनगर-ओबीसी समाजाच्या आंदोलकांना लाथा बुक्क्याने तुडवलं, आगामी निवडणुकीत माज उतरवणार?

Solapur Dhangar Community protest

Dhangar Community Protest | एकाबाजूला महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. अशातच राज्यातील ओबीसीसह इतर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजातील लोकही आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने संतापलेल्या धनगर समाजातील कार्यकर्त्याने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला आहे.

सोलापुरात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला

सोलापुरात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर धनगर समाजाच्या वतीने भंडारा फेकण्यात आला आहे. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात हा सगळा प्रकार घडला. धनगर आरक्षण कृती समिती सोलापूरच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला.

धनगर आरक्षणासाठी सोलापुरात धनगर समाज आक्रमक झालेला आहे. धनगर समाजाच्या कृती समितीच्या दोन ते तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देताना हा प्रकार घडला आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी लाथा बुक्क्याने तुडवलं

हा प्रकार घडताच तिथेच असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना जोरदार मारहाण सुरू केली. बंगाळे यांना खाली पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवले. त्यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी विखे पाटील यांनी अरे सोडून द्या त्याला. मारू नका, असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी बंगाळे याला बाहेर ओढत नेलं.

अन्यथा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे फासणार – शेखर बंगाळे

यावेळी शेखर बंगाळे यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आम्ही आज भंडारा उधळला आहे. आमचा निषेध नोंदवला आहे. धनगर समाजाला अजूनही आरक्षण देण्यात आलेलं नाही. आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं जात नाही. आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये, असं सांगतानाच आम्हाला आरक्षण नाही दिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बंगाळे यांनी दिला आहे.

News Title : Solapur Dhangar Community protest in front of minister Radhakrishna Vikhe Patil 08 September 2023.

हॅशटॅग्स

#Solapur Dhangar Community protest(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x