23 September 2019 11:08 AM
अँप डाउनलोड

हातकणंगले: शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी; स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी पराभूत

Raju Shetty, Dharyashil Mane, Shivsena, MIM

हातकणंगले: लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शिवसेनेकडून पहिल्यांदा उमेदवारी घेणारे धैर्यशील माने आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.

दरम्यान, आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये सेनेचे धैर्यशील माने विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे याच लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चांगली ताकद असताना सुद्धा पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणूक देखील होणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी पक्ष नेमकी काय भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Raju Shetty(20)#Shivsena(571)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या