लस बनविणारी कंपनी म्हणते | पुढील १० वर्ष तरी कोरोनाचा विषाणू आपल्यासोबत राहील
लंडन, २६ डिसेंबर: सध्या जगभरात अनेकांना एकच प्रश्न भेडसावत आहे आणि तो म्हणजे कोरोना व्हायरसचा नेमका अंत कधी होणार. यायाबात जागतिक आरोग्य संघटनेने अनेकदा भाष्य केलं आहे. त्यावेळी प्रतिदावे देखील करण्यात आले होते. मात्र आता कोरोनावर लस बनविणाऱ्या कंपनीनेच अभ्यासाअंती मोठं विषय पुन्हा चर्चेला आला आहे.
सध्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनची चर्चा युरोपात रंगली आहे आणि त्यानंतर हे वक्तव्य समोर आलं आहे . त्यानुसार कोरोनाचा हा प्रकोप लक्षात घेता पुढील कमीत कमी दहा वर्ष तरी कोरोनाचा विषाणू आपल्यासोबत राहील, असं महत्वपूर्ण विधान BioNTech चे सीईओ उगुर साहिन यांनी केलं आहे.
कोरोना व्हायरस संदर्भातील एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये साहिन यांना कोरोनाच्या डेडलाइनबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या संदर्भात संवाद साधला. त्यावेळी बोलताना म्हणाले की आपल्याला ‘न्यू नॉर्मल’ची परिभाषा समजून घेण्याची गरज आहे. पुढील १० वर्षतरी कोरोनाचा विषाणू आपल्यासोबत राहणार आहे, असं साहिन यांनी स्पष्ट केलं.
BioNTech ची कोरोनावरील लस अमेरिकेच्या दिग्गज फायझर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने विकसीत करण्यात आली आहे. या लशीला सध्या ४५ हून अधिक देशांमध्ये सार्वजनिक वापरासाठी मंजुरी देखील देण्यात आली आहे. ब्रिटन आणि अमेरिका या देशांचाही यात समावेश आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर देखील सहा आठवड्यांमध्ये लस तयार होऊ शकते, असं सुद्धा साहिन यांनी माहिती देताना सांगितलं आहे.
News English Summary: The new strain of the corona virus is currently being discussed in Europe, and the statement has since surfaced. According to Ugur Sahin, CEO of BioNTech, the corona virus will stay with us for at least the next ten years, given the corona outbreak.
News English Title: Corona virus will be there at least for 10 years said BioNTech experts News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा