जळगाव : जळगाव शहरात भाजपच्या वर्धापनदिनाच्या बॅनरवर शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील झळकले आहेत. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणाऱ्या या बॅनरवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील झळकले असल्याने संपूर्ण जळगाव शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना भाजप एकत्र सत्तेत असले तरी त्यांच्यात नेहमीच राजकीय कलगीतुरा राज्यभर पाहावयास मिळतो. इथे मंत्रालयात जाऊन सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री भेट देत नाहीत, त्यात शिवसेनेचे मंत्री थेट त्याच मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणाऱ्या बॅनरवर आणि तेही थेट भाजपच्या वर्धापनदिनाच्या बॅनरवर दिसतात हे संपूर्ण जळगाव शहरात कोणालाच कळेनासं झालं आहे.

गुलाबराव पाटील यांना या संबंधित काही पत्रकारांनी संपर्क साधला असता, त्यांनी हे नजर चुकीने झाले असल्याचं कारण पुढे केलं आहे. तसेच मला सुद्धा हे आताच समजलं आहे आणि मी त्याचा जाब भाजप जिल्हा अध्यक्षांना विचारणार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. परंतु अशी चूक केवळ नजरचुकीने कशी होऊ शकते अशी चर्चा जळगावात सुरु झाली आहे.

shivsena leader Gulabrao Patil on bjp banner in Jalgaon