19 January 2022 12:11 AM
अँप डाउनलोड

माधुरी दीक्षितचा मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट' टिझर लाँच

मुंबई : माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’चा टिझर लाँच करण्यात आला. स्वतः माधुरीने तो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.. झी चित्रपट गौरव सन्मान सोहळ्यात ‘बकेट लिस्ट’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी माधुरीने तो तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

माधुरी तिच्या पहिल्या मराठी चित्रपटात माधुरी साने या भूमिकेत दिसणार आहे. म्हणजे सानेंच्या घरची ही सून आणि तिच्या आयुष्यात एक व्यक्ती येते आणि माधुरी साने पूर्णपणे बदलून जातात अशी काहीशी कहाणी आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन तेजस देऊस्करनं केलं आहे. वंदना गुप्ते, रमेश टिपणीस आणि सुमित राघवन असे अनुभवी कलाकार या सिनेमात आहेत.

माधुरीचं मराठी चित्रपट श्रुष्टीतील हे पाहिलं पाऊल आहे, त्यामुळे तिच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘बकेट लिस्ट’ सिनेमाची एक झलक,

हॅशटॅग्स

#Madhuri Dixit(1)

राहुन गेलेल्या बातम्या

x