29 March 2024 1:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

मराठा आरक्षणावर आज सुनावणी | आरक्षण पूर्ण खंडपीठाकडे जाणार की नाही?

Maratha Reservation, hearing today, High Court, Supreme Court

नवी दिल्ली, २६ ऑगस्ट : मराठा आरक्षणाची नियमित सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या पूर्ण घटनापीठाकडे वर्ग करण्याबाबतच्या अर्जांवर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हावी असा अर्ज राज्य सरकारने जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टात केला आहे. तसंच हीच मागणी करणारा अर्ज या प्रकरणातील इतर 9 हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनीही केला आहे. राज्य सरकारच्या आणि इतर 9 याचिकाकर्त्यांच्या या अर्जांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे.

सध्या मराठा आरक्षणाची सुनावणी ही 3 न्यायमूर्तींच्या समोर सुरु आहे. पण पूर्ण घटनापीठामध्ये 5 न्यायमूर्तींचा समावेश असतो. तसंच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या काही खटल्यांची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्या पूर्ण घटनापीठासमोर सुरु आहे. त्यात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 10 टक्के दुर्बल घटकांसाठीचं आरक्षण, तामिळनाडूतील आरक्षण यांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची सुनावणी देखील पूर्ण घटनापीठासमोर व्हावी, अशी राज्य सरकारसह इतर याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

अशात आता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटल्याचं पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्र सरकार अजूनही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गंभीर नाही आहे. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी असताना महाराष्ट्र सरकारच्या वकीला मध्येच समन्वय पाहायला मिळत नाही असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. तर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता सरकार गंभीर नसल्याचा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी फेटाळला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे ते सरकार करतं आहे असं प्रत्युत्तर थोरात यांनी दिलं आहे. आम्ही सगळ्या मराठा संघटनांशी, वकीलांशी चर्चा करत आहोत. मराठा आरक्षणाबाबत काही जणांनी राजकारण सुरु केलं आहे. हा विषय राजकारणाच्या पलीकडे असला पाहिजे. पण जण राजकीय मतलब साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप थोरात यांनी केला आहे.

 

News English Summary: The regular hearing of the Maratha reservation will be heard today on the petitions for transfer to the full bench of the Supreme Court. The state government has filed a petition in the Supreme Court in July seeking a hearing on the Maratha reservation.

News English Title: Maratha Reservation hearing today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x