16 December 2024 2:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

...तर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना बाहेर पडू देणार नाही

Maratha Kranti Morcha activists, CM Uddhav Thackeray, Maratha reservation

मुंबई, २८ जुलै : उद्धव ठाकरे हे मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर करताय. काही मराठा समाजातील लोक दलाली करताय त्यांचाही लवकर बंदोबस्त करू’ असे नानासाहेब जावळे पाटील यांनी म्हटले. पुण्यात मराठा आरक्षण संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आंदोलनतील ४२ आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी त्वरित मार्गी लावावा अन्यथा वर्षा बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. ९ ऑगस्ट पर्यंत आमचा निर्णय घेतला नाही तर सत्तेतील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नसल्याचेही ते म्हणाले.

आम्हाला गोळ्या झाडा, जेलमध्ये टाका पण आम्ही मागे हटणार नाही. मराठा आंदोलनातील ४२ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख आणि घरातील एकाला शासकीय नोकरी द्यावी. आधी हा निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही उपसमितीच्या बैठकीला जाणार नाही असे ते म्हणाले.

काल काय झालं सुप्रीम कोर्टात?
सुप्रीम कोर्टात क्रमांक एकची केस दिसल्यानंतर देखील तांत्रिक कारणामुळे सुनावणी उशिराने सुरू झाली. सुनावणी सुरू होताच महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद करणे कठीण आहे. यावर कोर्टाने आपल्या म्हणण्याचा निश्चित विचार करू असं म्हटलं.

महाराष्ट्र राज्याने गेल्या ४ मे २०२० रोजीच्या शासकीय ठरावावर अपेक्षा असलेल्या सरकारी विभागांना नियमित नेमणूक करण्यास नकार दिला. याचिकाकर्त्यांनी राज्याच्या या याचिकेला विरोध दर्शविला आणि कोर्टाला सुनावणी करण्याचे आवाहन केले. अनेक महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून या प्रकरणाची सुनावणी होणे अत्यावश्यक आहे, असा त्यांचा दावा होता.

 

News English Summary: Uddhav Thackeray uses the Maratha community for politics. We will soon deal with some people from the Maratha community who are engaged in trafficking, ‘said Nanasaheb Jawle Patil. He was speaking at a press conference on Maratha reservation in Pune.

News English Title: Maratha Kranti Morcha activists are aggressive on Maharashtra government for Maratha reservation News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x