27 April 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

जेष्ठ विधितज्ञ पी.एस. नरसिंहा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू मांडणार

senior advocate PS Narasimha, Maratha reservation, Supreme Court

मुंबई, १ जुलै : जेष्ठ विधितज्ञ पी.एस.नरसिंहा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडणार असल्याची माहिती ऍडव्होकेट विनोद पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या वतीने विनोद पाटील न्यायालयीन लढा लढत आहेत, येत्या ७ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून विनोद पाटील यांनी त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. पी.एस. नरसिंहा हे देशातील नामांकित विधितज्ञ असून त्यांनी मध्य प्रदेशमध्ये आरक्षणाची केस लढली होती तसेच देशातील बीसीसीआय’सारख्या इतर प्रमुख केसेसमध्ये बाजू मांडलेली आहे. ते देशाचे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया होते.

तत्पूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकत त्यांनी म्हटलं होतं की, ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी आहे. मात्र आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारच दुर्लक्ष आहे, कारण राज्य सरकारच्या वतीने दिल्ली येथे कोणत्याही ज्येष्ठ विधीतज्ञांशी संपर्क झालेला नाही. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्य सरकारी वकील हे ३ महिन्यापासून मुंबईमध्ये आहेत, त्यांनी एखाद्या दिग्गज वकीलाशी संपर्क साधला का? राज्य सरकारच्या वतीने कोणते ज्येष्ठ वकील आरक्षण टिकवण्यासाठी बाजू मांडतील? सुनीवणीची काय तयारी केली? सर्व सरकारी वकीलांना याेगय कागदपत्र पोहोच केलेत का? कधी मीटिंग घेणार? या बाबत तातडीने खुलासा करावा. समाजाच्या वतीने मी लढा देत आहे, मी माझ्या वतीने सर्व तयारी केली आहे. दिग्गज विधितज्ञ आपल्या बाजूने युक्तिवाद करतील. परंतु शासनाची सुद्धा जबाबदारी आहे हे विसरू नये. पांडुरंग आपल्या सोबतच आहे परंतु आरक्षणाच काही बर वाईट झाल तर सरकार जबाबदार राहील.

 

News English Summary: Advocate Vinod Patil has informed that senior advocate PS Narasimha will defend the Maratha reservation in the Supreme Court. Advocate Vinod Patil is fighting a court battle on behalf of the Maratha community.

News English Title: Senior advocate PS Narasimha will defend the Maratha reservation in the Supreme Court News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x