13 December 2024 8:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

मराठा समन्वय समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा | मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध

Remove Ashok Chavan, Maratha Samaj Reservation Sub Committee, MLA Vinayak Mete

पुणे, ८ ऑगस्ट: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण न्यायालयात महाविकास आघाडी सरकारकडून बाजू मांडली जाताना दिसत नाही. तर आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे आहेत. मात्र त्यांनी आजवर कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेतले नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांना या पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी मराठा आमदार विनायक मेटे यांनी केली. मराठा समन्वय समितीची बैठक आज पुण्यात पार पडली, या बैठकीनंतर ते बोलत होते.

मराठा समन्वय समितीच्या बैठकीनंतर विनायक मेटे यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण खटल्याची सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुरु असताना त्याकडे महाविकासआघाडी सरकार गांभीर्याने पाहत नाही. सरकार आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नाकर्तेपणा दिसून येत आहे, त्यामुळे मिळालेले आरक्षण जातंय की काय, अशी शंका आहे, तसंच समाजाचे प्रश्नही प्रलंबित आहेत, अशा परिस्थितीमध्ये अशोक चव्हाणांना हटवावे. एकनाथ शिंदे किंवा सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे. मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांकडून जबाबदारी काढून घ्यावी’, असं विनायक मेटे म्हणाले आहेत.

 

News English Summary: Therefore, Ashok Chavan should be removed from this post, demanded Maratha MLA Vinayak Mete. He was speaking after the meeting of the Maratha Coordinating Committee held in Pune today.

News English Title: Remove Ashok Chavan From Maratha Samaj Reservation Sub Committee MLA Vinayak Mete News Latest Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x