12 December 2024 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

भीमा-कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीस चौकशीच्या फेऱ्यात अडकणार?

Bhima Koregaon, Former CM Devendra Fadnavis

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भीमा-कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगासमोर उलट तपासणी करा, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय लाखे पाटील यांनी केली आहे. आपल्या विशेषाधिकाराचा वापर करुन देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी करण्यात यावी यासाठी त्यांना साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे, अशी मागणी मी तपास आयोगाकडे केली आहे. फडणवीस यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप केले होते. मात्र, त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्याविरोधात कारवाईसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही, असं लाखे पाटील यांनी सांगितलं.

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावावं, त्यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी घ्यावी, मागील भाजपा सरकारने या प्रकरणात अर्बन नक्षलचा मुद्दा आणला पण खऱ्या आरोपींची चौकशी केली नाही. चौकशी आयोगाने या घटनेतील सर्व कॉल रेकॉर्ड, पोलीस कंट्रोल रुमचे कॉल्स, वायरलेसचे कॉल याबाबत सर्व तपासणी करावी असं संजय लाखे पाटील यांनी मागणी केली आहे.

माजी मुख्यमंत्र्यांचं निवेदन म्हणजे हिंदूत्त्ववादी नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारं आहे. हिंसाचारात भगवे झेंडे फडकावणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचं स्थानिक पोलिसांनी संरक्षण केलं, यावरही त्यांनी भाष्य केलं नाही. फडणवीस यांचं निवेदन आणि पोलिसांच्या तपासात विसंगती असल्याने त्यांना चौकशीसाठी बोलवणं गरजेचं आहे, असा डॉ. संजय लाखे पाटील यांनी याचिकेत म्हटलं आहे.

 

Web Title:  Former CM Devendra Fadnavis will be investigated Bhima Koregaon Case.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x