14 December 2024 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

राज्यात सत्तांतर झाल्याने कोरेगाव भीमा येथे दंगल घडवण्याचा डाव होता: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar, Koregaon Bhima

पुणे: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही भीमा-कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर, तेथे जमलेल्या विविध संघटनांशी वार्तालाप केला. याठिकाणी आज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात सभाही घेतली जाणार असून सर्वच अनुयायांना मार्गदर्शन केले जाणार आहे. मात्र, विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पोलिसांनी दक्षता घेतली आहे, काही जणांवर ते नजर ठेऊनही आहेत. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नसल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. मात्र, मराठवाडा विद्यापीठ नामांतरावेळी राजकीय परिस्थिती बदलल्याने लोकांनी राजकीय दंगल घडवली. सध्याही राज्यात सत्तांतर झाले असून त्याचा फायदा घेऊन कोरेगाव भीमा येथे दंगल घडवण्याचा डाव होता. पण, आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून हा डाव उधळून लावल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला आहे.

तसेच आज सकाळपासून राज्यभरातून हजारो संख्येने भाविक याठिकाणी येत आहेत. उत्साहाचे वातावरण येथे असून, नागरिकांकडून रांगेत येऊन विजयस्तंभाला अभिवादन करण्यात येत आहे. हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस व जिल्हाप्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी इंटरनेट वापराला अडचण येते. तेव्हा नागरिकांना तत्काळ संपर्क साधता यावा, यासाठी खास “इमर्जन्सी कम्युनिकेशन प्लॅन’ची व्यवस्था जिल्हाधिकारी प्रशासनाने केली आहे. तसेच, पोलिस व अन्य सेवांसाठी खास हॉटलाइनचीही व्यवस्थाही केली आहे.

या परिसरातील खासगी कंपन्या, शाळा, आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच वाघोली, लोणीकंद, पेरणेफाटा, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, सणसवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यंदा पोलिसांनी चांगली व्यवस्था केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर, प्रशासनाकडून सर्व काळजी घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अभिवादनानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला नवीन वर्षाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे, येथील शौर्यस्तंभास एक वेगळा इतिहास आहे. दरवर्षी या ठिकाणी अभिवादनासाठी मोठ्यासंख्येने नागरिक येतात, मी राज्यातील जनतेच्यावतीने येथील शौर्यस्तंभास अभिवादन करतो. मध्यंतरी काही घटना घडल्या होत्या, मात्र सरकार त्यामध्ये चांगल्याप्रकारची काळजी घेत आहे. आज देखील पोलीस व प्रशासनाकडून बंदोबस्त अतिशय व्यवस्थित ठेवण्यात आला आहे. माझं या निमित्त नागरिकांना आवाहन आहे की, अनेकजण या ठिकाणी अभिवादनासाठी येत असतात, त्यांनी जरूर या ठिकाणी यावं परंतु येत असताना शांतता राखावी, कोणत्याही प्रकारे अफवा पसरवण्याचा जर कोणी प्रयत्न केला, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये.

कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी १ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली. यात महार बटालियनच्या ५०० सैनिकांनी पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. त्यात महार रेजिमेंटच्या अनेक सैनिकांना वीरमरण आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. १९२७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव १ जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले.

 

Web Title:  We sit down with ruling Parties and avoid Riots Koregaon Bhima Prakash Ambedkar says during Press Conference.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x