17 April 2021 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज असल्याने विषाणूचा फार वाईट परिणाम होणार नाही - डॉ. गुलेरिया पियुष गोयल महाराष्ट्रातून राज्यसभेवर | पण संकटात महाराष्ट्रावर निर्लज्ज राजकारणाचा आरोप राज्यावर कोरोना संकट | राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलं ११०० बेडचं कोविड सेंटर | १०० बेड्सना ऑक्सिजन सुविधा देशभरात रुग्णांना रेमडेसीवीर नाही, ऑक्सीजन नाही, अंत्यसंस्कारासाठी रांगा तरी मोदी निवडणुकीच्या प्रचारात कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल | उद्धव ठाकरेंचं उद्योगांना नियोजनपूर्वक सज्ज राहण्याचं आवाहन तुम्ही 'प्रधान कोवइडियट' आणि सुपर स्प्रेडर आहात | देशाच्या इतिहासातील सर्वात निर्लज्ज पंतप्रधान - काँग्रेस नेत्याची टीका मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन-रेमडेसिवीर संदर्भात मोदींना कॉल केला | पण ते प्रचारात आहेत असं उत्तर मिळालं
x

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना गॅस दरवाढीचा दणका

LPG Gas Cylinder Price Hike, PM Narendra Modi

नवी दिल्ली: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे. सलग पाचव्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

गॅस कंपन्यांनी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर (१४.२ किलो)च्या दरात १९ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस ७४९ रुपयांना मिळणार आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडर (१९ किलो)च्या किंमतीत २९.५० वाढ करण्यात आल्याने आता सिलिंडर घेण्यासाठी १३२५ रुपये मोजावे लागणार आहेत. सिंलिंडरचे नवीन दर आजपासून (बुधवार) लागू करण्यात येणार आहे.

मे-जूनपासून सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. चीन आणि अमेरिका यांमधील व्यापारी संघर्षाने जागतिक कमोडीटी बाजारावर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतींवर परिणाम होत असल्याने पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेत आहेत. चलन विनिमय दरातील बदल इंधन आयातीच्या खर्चात वाढ करतात. २०१९ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयात २.२८ टक्के अवमूल्यन झाले.

 

Web Title:  LPG Gas Cylinder Price Hike on very first day of new year.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1485)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x