14 May 2021 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची खोटी माहिती? 1.23 लाख मृत्यूचे दाखले वितरित अन कोरोनाने मृत्यूचा आकडा 4218 दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच....
x

निलेश राणे रामदास कदमांना म्हणाले, आज तुम्हाला शिवी घालणार नाही!

Former MP Nilesh Rane, Shivsena Leader Ramdas Kadam

कणकवली: “रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले,” अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र, माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे विधान परिषदेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम नाराज असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना निलेश यांनी टीका केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

रत्नागिरीचे माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून कदम व पर्यायानं उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. आपल्या ट्विटमध्ये राणे म्हणतात, ‘रामदास कदम, तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खूश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले. आम्हाला शिव्या घालून तुम्ही शिवसेनेशी किती निष्ठावान आहात हे दाखवायचा. पण आज तुम्हाला उलट शिवी घालणार नाही कारण न घालताच ती तुम्हाला बसलेली आहे.’

 

Web Title:  Former Ratnagiri MP Nilesh Rane slams former Minister Ramdas Kadam for not getting cabinet berth in Maharashtra.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x