23 November 2019 8:09 AM
अँप डाउनलोड

भाजप-सेना सरकारला धक्का! ‘आरे’तील वृक्षतोड तात्काळ थांबवा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Save Aarey, SaveAarey, Save Forest, Supreme Court of India

नवी दिल्ली: कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरूच असून, या परिसरात नाकाबंदी आणि जमावबंदी कायम आहे. दरम्यान, विधि शाखेच्या विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे आरेमधील वृक्षतोडीकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. विद्यार्थ्यांच्या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आले आहे. आज या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी सुरू असलेली वृक्षतोड तत्काळ प्रभावाने थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या आरेतील वृक्षतोडीचा मुद्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. पुढील सुनावणी होईपर्यंत न्यायालयाने वृक्षतोड करण्यास स्थगिती दिली आहे. ग्रेटर नोएडातील विद्यार्थ्याने लिहिल्या पत्राची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने स्यु मोटू याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती देण्याबरोबरच अटक केलेल्या आंदोलकांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

हॅशटॅग्स

#Mumbai(58)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या