भाजपकडून सहकारी पक्ष हॅक; कमळावर निवडणूक

मुंबई : भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या हॅक केले आहेत, असंच म्हणावं लागेल. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, पण त्यातीलच म्हणावे लागतील.
या पक्षाच्या प्रमुखांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास महादेव जाणकार आणि सदाभाऊ खोत हे राज्य मंत्रिमंडळात आहेत, तर रामदास आठवले हे केंद्रात मंत्रीपदी आहेत. त्यात कोणतीही राजकीय शक्ती नसलेले विनायक मेटे यांना खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचं अध्यक्ष पद आणि शासनाच्या खचातून २० लाखाची गाडी बहाल करण्यात आली आहे. वास्तविक या सर्व नेत्यांना त्यांच्या स्वबळाची जाणीव नसणार असा विषय नसून, भाजपाला देखील त्याची कल्पना आहे. केवळ एका अमुक समाजाच्या चेहरा म्हणून त्यांना मंत्रिमंडळात स्थान आहे असंच म्हणावं लागेल. यांच्या मंत्रिमंडळातील आणि विकासाच्या कामगिरीवर न बोललेलंच बरं आहे.
भाजपने या चारही पक्षातील प्रमुखांना सत्तेत खुश करून त्यांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे वापरलं आहे. त्यात पक्ष वेगळे असले तरी त्यांना निवडणूक देखील भाजपच्या कोट्यातून आणि चिन्हांवर लढवावी लागते. मध्यंतरी या चारही नेत्यांनी एकत्र येऊन भाजपवर दबाव टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि त्यानिमित्ताने एका हॉटेलमध्ये बैठक देखील बोलावली, मात्र भाजपने त्याकडे ढुंकूनही पहिले नाही आणि हे नेते पुन्हा शांत झाले. आमचा पक्ष आहे हे दाखवण्यासाठी, दरवर्षी केवळ पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यापलीकडे त्यांच्या हातात सध्या काहीच नाही. अनेक वेळा विधासनसभा निवडणुकीच्या तोंडावर १०-१५ जागांची मागणी केली जाते, मात्र इथे शिवसेनेची डाळ शिजत नाही तिथे पक्षांना कोण विचारणार अशी अवस्था आहे. त्यामुळे पक्ष वेगळे असले तरी त्यांच्या अध्यक्षांना भाजपच्या तालावर नाचण्याशिवाय सध्या तरी दुसरा मार्ग नाही असंच म्हणावं लागेल.
दरम्यान, रासपला निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यासाठी अधिक जागांवर लढण्याबरोबर पक्षाच्या चिन्हावर लढणे आवश्यक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमचे उमेदवार भाजपच्या कमळाच्या चिन्हावर लढणार नाहीत तर रासपच्या चिन्हावर लढतील, असे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष व पशुपालन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पक्षाच्या मेळाव्यात जाहीर केले होते. मात्र दौंड विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार आमदार राहुल कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केल्यामुळे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. कारण महायुतीमध्ये रासपच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवार हे कमळ या चिन्हावर नव्हे तर रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी भूमिका महादेव जानकर यांनी घेतली होती.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Viral Video | त्याचा वेगाने येणाऱ्या कारच्या धडकेने मोठा अपघात होतो, नंतर जे घडलं ते पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही
-
5G Spectrum Auction Scam | 5G स्पेक्ट्रम लिलावात महाकाय घोटाळा झाला?, दाक्षिणात्य नेते आक्रमक, वरिष्ठ पत्रकारांचं ट्विट
-
शिंदे-फडणवीस सरकारच्या 'मायक्रो कॅबिनेट' मंत्रिमंडळाचा जम्बो निर्णय | सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी प्रभाग रचनांबाबत घाईत निर्णय?
-
Amazon Great Freedom Festival 2022 | अॅमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, गॅझेट्स अत्यंत स्वस्त
-
Notice Period Rule | तुम्ही नोटीस पिरियडची सेवा पूर्ण केल्याशिवाय नोकरी सोडू शकता का?, नियम काय आहेत जाणून घ्या
-
शिवसेनेच्या चिन्हाबाबत सध्या कोणताही निर्णय घेऊ नका, सुप्रीम कोर्टाचे मुख्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे आदेश
-
ELSS Vs Gold Mutual Fund | ईएलएसएस किंवा गोल्ड म्युच्युअल फंडांपैकी कोणती योजना चांगला परतावा मिळवून देईल, जाणून घ्या
-
Top 4 Gold Fund | गोल्ड फंड मध्ये गुंतवणूक करून मिळवा जबरदस्त परतावा, हे चार गोल्ड तुम्हाला मालामाल करतील
-
Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफ जबरदस्त परतावा देणारा गुंतवणूक पर्याय, तुम्हालाही मिळेल मल्टिबॅगेर परतावं
-
Multibagger IPO | या आयपीओने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 110 टक्के परतावा, स्टॉक पुढेही फायद्याचा