11 December 2024 11:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड लसीचा पहिला डोस घेतला

CM Uddhav Thackeray, COVID vaccine

मुंबई, ११ मार्च: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड लसीचा पहिला डोस घेतला. दरम्यान कोरोनाचा धोका वाढतो आहे, पात्र असल्याने सर्वांनी मनात शंका न ठेवता नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. कोरोना लसीकरण वेगाने वाढत आहे, तरी काही दिवसात काही ठिकाणी कडक लॉकडाऊन करावे लागेल, त्यामुळे काळजी घ्या, लॉकडाऊनबाबत येत्या एक दोन दिवसात निर्णय घेऊ असे देखील संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान, कोव्हॅक्सीन ही लस घेते वेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या मातोश्री यांनी देखील लस घेतली आहे. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

मुंबईतल्या जे जे हाँस्पिटलमध्ये ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लस घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री अशा तीन जणांना लस देण्यात आली. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कुटुंबासह कोविडशिल्ड लस घेतली होती. त्यांनी सिरम इंस्टिट्यूटची कोविशिल्ड लस घेतली होती.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray today took the first dose of Kovid vaccine. Meanwhile, the threat of corona is increasing, the Chief Minister has appealed to the citizens to get vaccinated without any doubt as they are eligible. Although corona vaccination is increasing rapidly, there will be strict lockdown in some places in a few days, so be careful, the CM has also hinted that a decision on lockdown will be taken in the next one or two days.

News English Title: CM Uddhav Thackeray took his first shot of COVID vaccine today news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x