19 April 2024 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

कोरोनाच्या साथीत पैशासाठी शाळेला हॉल भाड्याने देणाऱ्या इस्पितळाने OPD बंद केला

Corona Crisis, Holy Spirit Hospital, OPD Service

मुंबई, २८ मार्च:  राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १५९वर गेली असून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ५६वर पोहोचली आहे. विमानांचे उड्डाण बंद केल्यानंतरही मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दोन कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशन चुकून झालं तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे मुंबईसह राज्यातील कोणत्याही भागात कम्युनिटी ट्रान्समिशन होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम न मोडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १९ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

कोरोना व्हायरस आतापर्यत बेरीज करत होता. आता मात्र तो पुढच्या म्हणजेच धोक्याच्या टप्प्यात पोहोचला आहे. कोरोना व्हायरस आता गुणाकार करत आहे. त्यामुळे पुढचे १५ दिवस अत्यंत कसोटीचे, परीक्षेचे असून जिथं आहात, तिथंच थांबा. घराबाहेर पडू नका, घरातच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन आणि कडकडीची विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र इतर छोटे मोठे आजार असणाऱ्यांची मोठी अडचण झाली असून स्थानिक खाजगी दवाखाने आणि इस्पितळांचे OPD बंद केल्याने सामान्य लोकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मात्र मुंबई अंधेरी पूर्व येथील होली स्पिरिट या खाजगी इस्पितळाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात कोरोना आपत्ती सुरुवातीच्या टप्प्यात असताना आणि मुबंईत काहींना लागण झालेली असताना देखील या इस्पितळाच्या मॅनेजमेंटने अंधेरी पूर्व मरोळ स्थित वंडर किड्स या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी इस्पितळाचा हॉल भाड्याने दिला होता आणि त्यावेळी चिमुकल्यांच्या आरोग्याचा विचार शाळेने आणि इस्पितळाने केला नव्हता. मात्र पालकांनी आक्रोश करताच कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी कोरोनावर माहिती देण्यासाठी हितसंबंध असणाऱ्या डॉक्टरांना ५ मिनिटासाठी बोलावून विषय बासनात गुंडाळण्यात आला.

मात्र काल राज्य सरकारतर्फे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सक्त ताकीद देऊन देखील या इस्पितळाने OPD बंद ठेवला असून, लॉकडाउनचं कारण देत डॉक्टर्स नाहीत असं सांगून लोकांना परत पाठविण्यात येतं आहे. वास्तविक अत्यावश्यक सेवेमुळे डॉक्टसर्स, नर्स यांना कोणतीही अडचण नसताना होली स्पिरिट इस्पितळ लोकांना मूर्ख बनवत असून राज्य सरकारच्या आदेशाला देखील झुगारत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी करत आहेत. त्यामुळे उद्या लोकं छोट्या मोठ्या आजाराने देखील दगावली तरी नवल वाटू नये अशीच परिस्थिती आहे.

 

News English Summary: However, a shocking information has emerged about the private hospital, Holy Spirit, in Andheri East, Mumbai. The management of the hospital had rented a hospital hall for the annual event of Wonder Kids, located in Andheri East Marol even when the corona disaster was in the early stages of the country and few people were infected in Mumbai. However, at the last minute of the program, parents who were interested in calling on the coroner to inform the coroner were summoned for 5 minutes. However, despite strong warning from the state government yesterday, Health Minister Rajesh Tope has kept the OPD closed and people are being sent back saying there are no doctors giving reasons for the lock down. The local residents are accusing the Holy Spirit Hospital of fooling the doctors and nurses without any problem due to the real urgent service. Therefore, tomorrow people will be surprised even with small illnesses, but this is not the case.

 

News English Title: Story Mumbai Andheri East Holy Spirit Hospital OPD service is closed after Corona virus crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x