शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा पूर्णपणे दिल्लीतून | फडणवीसांचा पत्ता अमित शाहांनी कापल्याची चर्चा
Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या राजकारणात २१ जूनला सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा केला. सगळ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्यानंतर उत्सुकता होती ती शिंदे गटाच्या साथीने भाजप सत्तेत येणार याची. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील ही चर्चाही रंगली होती. ३० जूनच्या दुपारपर्यंत हीच चर्चा सगळीकडे रंगली होती. अगदी भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलनेही मी पुन्हा येईन ही देवेंद्र फडणवीस यांची कविता ट्विट करून या सगळ्या घडामोडींना एक अर्थ दिला.
शिंदेच मुख्यमंत्री होतील असं फडणवीसांना सांगण्यात आलं?
बंडखोरीच्या काळात खरंतर देवेंद्र फडणवीस हे दोनदा दिल्लीला जाऊन आले. त्यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. पण या घडामोडींमध्ये नेमकं घडतंय काय, याची कोणतीच माहिती पुढे येऊ शकली नव्हती. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानं दुसरीकडे देवेंद्र फडणवीस समर्थकांकडून अभिनंदाचा वर्षाव होण्यात सुरुवात झालेली होती. देवेंद्र फडणवीसच आता मुख्यमंत्री होतील, असा विश्वास प्रत्येकाला वाटत होता.
घोषणा करतील हे अपेक्षित असतानाच… :
दरम्यान, पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याची घोषणा करतील हे अपेक्षित असतानाच त्यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील हे जाहीर केलं. तसंच आपण सत्तेत असणार नाही पण सरकारवर लक्ष ठेवणार हे देखील सांगितलं. शिंदे यांच्या शपथविधीला एक तास बाकी असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस हे सत्तेत सहभागी होतील आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे जाहीर केलं. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनीही हीच बाब जाहीर केली. मग देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
निर्णय हा पूर्णपणे दिल्लीतून – इंडियन एक्स्प्रेस :
दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री कुणाला करायचं, याबाबतचा निर्णय हा पूर्णपणे दिल्लीतून अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी घेतलेला होता, अशीही समोर येतेय. सूत्रांच्या हवाल्यानं याबाबतची माहिती दिलीय. त्यामुळे जेपी नड्डा आणि अमित शाह यांनी पुढे येत, फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घेण्याचं केलेलं आवाहनही न टाळता येण्यासारखंच होतं. हा एका राजकीय खेळीचा भाग होता, असंही जाणकार सांगतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Amit Shah made check mate to Devendra Fadnavis by making him deputy Chief Minister check details 01 June 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News