26 April 2024 10:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

ठाकरे सरकार हाजी अलीत साकारणार मुघल गार्डन; मेकओव्हरसाठी ३५ कोटी

Mumbai famous Tourist point, Haji Ali, makeover

मुंबई: मुंबईतील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या हाजी अली दर्गाचे नुतनीकरण व सौंदर्यीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज येथे दिले. हाजी अली दर्गा नुतनीकरण व सौंदर्यीकरणासंदर्भात आज मंत्रालयात अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी दर्गाच्या नुतनीकरण व सौंदर्यीकरणाच्या आराखड्याचे सादरीकरणही करण्यात आले.

शेख म्हणाले, हाजी अली दर्गा येथे दररोज देशविदेशातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. हे एक महत्त्वाचे धार्मिक तसेच पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे या परिसराचे नुतनीकरण व सौंदर्यीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवाने तातडीने घेण्यात यावेत. तसेच सौंदर्यीकरणात बाधा येणारे या परिसरातील अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याचीही कार्यवाही तातडीने करावी.

त्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या कामासाठी तातडीने १० कोटी रुपये देण्याचं अर्थमंत्र्यांनीही मान्य केलं आहे. विशेष म्हणजे हाजी अली ज्यूस सेंटर ते मुख्य दरवाजा पर्यंत ३० हजार स्क्वेअर फुटावर मुघल गार्डन तयार करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनच्या धर्तीवरच हे गार्डन असणार आहे. अडीच वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचं अस्लम शेख यांनी सांगितलं.

हाजी अलीला दररोज देश-विदेशातून हजारो भाविक येत असतात. त्यामुळे धार्मिक स्थळाबरोबरच पर्यटन स्थळ म्हणूनही हाजी अलीला महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे या दर्ग्याचे आणि आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण होणं गरजेचं असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title: Story Mumbai famous Tourist point Haji Ali set to get a 35 crore makeover.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x