24 April 2024 6:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

मंत्री अस्लम शेख यांना मनसेच्या मोर्चावर शंका; तर शेख यांना बॉम्बस्फोटातील दोषीची दया आली होती

MInister Aslam Shaik, Yakub Memon, Mumbai Bomb Blast, MNS Morcha

मुंबई: ‘बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांना हाकलून द्या,’ या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच एक मोर्चा काढणार आहे. परंतु या मोर्चाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतलेल्या भूमिकेमुळे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मोर्चासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून जिजामाता उद्यान, भायखळा ते आझाद मैदानाचा मार्ग मागण्यात आला आहे. मोर्चासंदर्भात आयोजित बैठकीमध्ये मनसे नेत्यांचा हा निर्णय झाला आहे. हा मोर्चा मोहम्मद अली रोडवरुन नेण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आग्रही आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरील पेच वाढण्याची शक्यता आहे. मोर्चा संबंधित मान्यता मिळण्यासाठी मनसेच्या नेत्यांनी पोलिसा अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे.

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लीम समुदाय रस्त्यावर उतरला असून मनसेच्या मोर्चाचा मार्ग हा मुस्लीम बहुल भागातून जाणार आहे. त्यामुळे या मोर्चामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच राज ठाकरेंच्या सुरक्षेचा प्रश्नही पोलिसांसमोर आहे. त्यामुळे मनसेच्या मोर्चाला अन्य मार्गावरुन जाण्यास परवानगी दिली जाऊ शकते. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनसेने पोलिसांकडे परवानगी मागितली असून पोलीस योग्य तो निर्णय घेतील असं सांगितलं आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची या मोर्च्याच्या तयारीबाबत बैठक झाली असून मुंबई पोलिसांकडे मनसेने परवानगी मागितली आहे. मोर्चा आझाद मैदानात संपणार हे नक्की पण सुरु कुठून होणार हे पोलिसांनी परवानगी आल्यानंतर कळेल असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.

मात्र यावरून मुंबईचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी आक्षेप घेत मनसेवर कायदा सुव्यवस्था बिघडविण्यासाठी हा मोर्चा काढला जातं आहे असा आरोप केला आहे. मात्र यावरून समाज माध्यमांवर अस्लम शेख यांना धारेवर धरलं जातं असून त्यांचा इतिहास देखील उघड केला जातं आहे.

१९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीवर दया दाखविण्याचे आवाहन करणारे कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र तशी याचना केली होती. २८ जुलै २०१५ रोजी त्यांनी आपल्या इतर मुस्लिम सहकाऱ्यांच्या मदतीने तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहिलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस सरकारमध्ये सध्या कॅबिनेट मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री झाले आहेत. त्यावेळी मुंबईच्या कायदा सूव्येवस्थेच्या चिंधड्या उडवून शेकडो मुंबईकरांचे प्राण घेणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोटाची घटना आजही मुंबईकरांच्या लक्षात आहे. मात्र त्यावेळी याच बॉम्ब स्फोटातील दोषीची म्हणजे याकूब मेमनची अस्लम शेख यांना दया आली होती आणि याकूब मेमनसाठी त्यांचं मन भरून आल्याने त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट याकूब मेमनच्या फाशीवर दया दाखविण्याचे आवाहन करणारे पत्र तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवलं होतं. आज तेच अस्लम शेख मुंबईच पालकत्व घेऊन बसले असून सध्या त्यांना इतर पक्षांच्या मोर्चांवर ‘कायदा-सूव्येवस्थेच्या’ नावावर आणि हेतूवर शंका वाटू लागली आहे हे विशेष.

काय होत ते नेमकं पत्र मुंबईच्या आजच्या पालकमंत्र्यांचं;

 

Web Title:  Minister Aslam Shaikh took objection over MNS morcha about to disturb Mumbai Law and Order situation.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x