28 January 2023 6:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 29 जानेवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Hindenburg Report Adani Group | अदानी ग्रुपबाबत हिंडेनबर्गचा अहवाल 'अत्यंत विश्वासार्ह'!, दिग्गज अब्जाधीश विल्यम एकमन Numerology Horoscope | 29 जानेवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bank Balance on WhatsApp | तुमच्या व्हॉट्सॲपवर समजेल तुमचा बँक बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया Speciality Restaurants Share Price | रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 170% परतावा दिला, आता स्टॉक नवीन टार्गेटच्या दिशेने Poonawalla Fincorp Share Price | करोडपती केलं या शेअरने! फक्त 22 हजारांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा, स्टॉक पुन्हा तेजीत Rama Steel Tube Share Price | परतावा असावा तर असा! या शेअरने 6 महिन्यांत 142% परतावा दिला, बाजार कमजोर पण स्टॉक तेजीत
x

हाफीज सईद तर संत वाटत असेल तुम्हाला? स्वरा भास्कर

loksabha election 2019

मुंबई : भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. भोपाळमध्ये मध्ये प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा असा थेट सामना रंगणार आहे. परंतु मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी यांना उमेदवारी दिल्याबद्दल अनेकांकडून टीका होत आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री आणि आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वरा भास्करनेही उडी घेतली आहे.

लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या यादीत आणखी एका नावाची भर. संभाव्य दहशतवादी, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा. द्वेष आणि विभाजनाच्या अजेंड्याबाबत भारतीय जनता पक्ष अत्यंत नग्न आहे,’ अशा शब्दांत स्वराने भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला.

स्वराच्या या ट्विटवर एका शिवसेना नेत्याने आक्षेप घेत तिला ‘कन्हैय्याची आई’ असं म्हटलं. ‘भारत तेरे तुकडे वाला चालतो पण एक निर्दोष महिला नाही चालत. स्वरा अजून किती खालच्या स्तरावर जाणार, ही तर हद्द झाली,’ अशी टीका त्याने केली. स्वराने कन्हैय्या कुमार यांना पाठिंबा देत त्यांच्यासाठी प्रचारसुद्धा केला होता. यावरही स्वराने प्रत्युत्तर देत ट्विट केलं, ‘चाचाजी, मी कितीही खालच्या पातळीवर गेली तरी तुम्ही आणि तुमच्या संघवाद्यांच्या पातळीपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. ही महिला तुम्हाला निर्दोष वाटते- वाह! मग तर तुम्हाला हाफिज सईद संत वाटत असेल? माफ करा, तो तर मुस्लीम आहे.’

हॅशटॅग्स

BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x