18 June 2021 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिवसेनेने, काँग्रेस-एमआयएम'च्या पुढे जाऊन हिंदुत्वाविरोधात काम करायला सुरुवात केली आहे - गिरीश महाजन मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी
x

पोलीस महासंचालकांना भेटले 19 एप्रिलला | गुन्हा दाखल होताच सिंग यांचे २९ एप्रिलला पुन्हा आरोप करत याचिका

Parambir Singh

मुंबई, २९ एप्रिल | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली असून नव्याने याचिका केली आहे. परमबीर सिंग यांनी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या चौकशीला आव्हान दिलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात लिहिलेलं पत्र मागे घेण्यासाठी दबाव असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तसंच राज्य सरकार एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला. उच्च न्यायालयात ४ मे रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

19 एप्रिल रोजी मी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना भेटलो होतो. यावेळी त्यांनी तुम्ही केलेल्या तक्रारी मागे घ्या. अन्यथा तुमच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू करण्यात येणार आहे, असं मला सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी सिंग यांनी याचिकेत केली आहे. सिंग यांनी आता राज्य सरकारवर नवा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या याचिकेवर येत्या 4 मे रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

यापूर्वी देखील त्यांनी आरोप करताना बराच उशीर केला होता. त्यांच्या केवळ आरोपांच्या पत्रावर सीबीआय चौकशी सुरु आहे. तसाच प्रकार पुन्हा घडला आहे. परमबीर सिंग पोलीस महासंचालकांना भेटले 19 एप्रिलला आणि आज गुन्हा दाखल होताच परमबीर सिंग यांनी २९ एप्रिलला पुन्हा आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली आहे.

 

News English Summary: Former Mumbai Police Commissioner Parambir Singh has once again filed a fresh petition in the High Court. Parambir Singh has challenged the ongoing probe by the state government. This time, he has made serious allegations against the Thackeray government.

News English Title: Former Mumbai Police Commissioner Parambir Singh has once again filed a fresh petition in the High Court news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(173)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x