27 July 2021 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

दाहकता | कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी कर्नाटक सरकारकडून बेंगळुरूजवळ 230 एकर जमीन

India corona pandemic

बंगळुरू, २९ एप्रिल | जगातील कित्येक देशांमध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, जगात गेल्या चोवीस तासांत 8 लाख 85 हजार 604 नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 15 हजार 284 लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील 17 देशांमध्ये भारतीय विषाणूचा स्ट्रेन आढळून आला असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओने याला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ (VOI) घोषित केले असून B.1.617 या डबल म्यूटेंट व्हेरिएंटमुळेच भारतात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत असल्याचा दावा केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तर भारताबाबत चिंताजनक वृत्त म्हणजे बुधवारी 3 लाख 79 हजार 164 नवीन रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या नवीन रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 27 एप्रिलला सर्वात जास्त 3.62 लाख रुग्ण समोर आले होते. या व्यतिरिक्त 24 तासांच्या आत 3,646 संक्रमितांचा मृत्यूही झाला आहे. हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा तीन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मंगलवारी 3,286 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कर्नाटकातही तेच पाहायला मिळतंय. कर्नाटकात कोरोनाची दाहकता राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे अधोरेखित होतं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी कर्नाटक सरकारकडून बेंगळुरूजवळ 230 एकर जमीन दिली आहे. राज्यात स्मशान भूमीच्या बाहेर वेटिंग आणि असलेल्या स्मशान भूमी देखील कमी पडू लागल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

 

News English Summary: Corona burning in Karnataka is underlined by a state government decision. According to the Times of India, the Karnataka government has allotted 230 acres of land near Bangalore for the funeral of covid patients. The state government has taken this decision as the waiting and existing cremation grounds outside the cremation grounds in the state are also declining.

News English Title: Karnataka government earmarks 230 acres around Bengaluru for cremation of Covid victims news updates.

हॅशटॅग्स

#Karnataka(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x