26 September 2023 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ganesh Pandal Fire | पुण्यात गणेश मंडपाला आग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बावनकुळे देखील मंडपात उपस्थित होते GTL Infra Vs Sonu Infra Share | जीटीएल इन्फ्राला ऑर्डर मिळेना, पण सोनू इन्फ्राटेक कंपनीला रिलायन्ससह अनेक ऑर्डर्स, स्वस्त शेअर सुसाट तेजीत Zen Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झेन टेक्नॉलॉजी शेअरने अवघ्या 9 महिन्यात 317 टक्के परतावा दिला, भरवशाचा स्टॉक खरेदी करणार? Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय? Tata Power Share Price | पॉवर सेक्टर स्टॉकमध्ये जोरदार तेजी, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा टाटा पॉवर शेअरला होणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 27 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या
x

Maratha Reservation | साताऱ्यात खा. उदयनराजे, शिवेंद्रराजे आणि विनायक मेटे यांच्यात चर्चा

Satara Vinayak Mete, MP Udayan Raje Bhosale, MLA ShivendraRaje Bhosale, Maratha Reservation

सातारा, 26 सप्टेंबर : मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी पुण्यात ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विचारमंथन बैठकीला छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थित राहावे या साठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी साताऱ्यात येऊन दोन्ही राजांना निमंत्रण दिले. दोघांनीही मेटे यांचे निमंत्रण स्विकारले असल्याने उदयनराजे, शिवेंद्रराजे, मेटे यांची वज्रमूठ तयार झाली आहे.

खासदार उदयनराजे यांनी मेटे यांच्याशी चर्चा करताना आजवरचे राज्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप केला, यापुढे उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी दिला, तर शिवेंद्रराजे यांनी मराठा आरक्षण टिकलेच पाहिजे त्यासाठी समाज जी भूमिका घेईल त्या सोबत राहू असा शब्द दिला. विनायक मेटे यांनी ३ ऑक्टोबरच्या बैठकीत योग्य निर्णय व दिशा मिळेल असे सांगितले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक शरद काटकर, हरीष पाटणे, सुनील काटकर, अमोल मोहिते, राजू भोसले, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, अनिल देसाई, भालचंद्र निकम, विक्रम पवार, युवराज ढमाळ आदी उपस्थित होते.

जलमंदिर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘ज्या मराठा समाजाने राज्यासाठी, देशासाठी मोठे योगदान दिले. त्या समाजातील पुढची पिढी सध्या हतबल अवस्थेत आहे. गुणवत्ता असूनही शिक्षण आणि नोकरीमध्ये योग्य ती संधी मिळत नसल्याने या समाजातील मुले-मुली चिंताग्रस्त आहेत. इतर समाजाचे आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, असे आम्ही म्हणत नाही तर इतर समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्याच पद्धतीने मराठा समाजही अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे. त्यांनादेखील आरक्षणाचा लाभ देऊन त्यांच्या भविष्याची चिंता मिटवावी, अशी आमची मागणी आहे. पुण्यात होणा-या बैठकीत याबाबत सविस्तर विचार मंथन होईल, मी या बैठकीला जाणार आहे. मराठा समाजाचे नेतृत्व कोणी करावे, यापेक्षा समाजाचा प्रश्न गांभीर्याने सुटणे महत्त्वाचे आहे.’

तसेच सुरुची येथे आमदार विनायक मेटे यांनी आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले यांना निमंत्रण दिले. तेव्हा शिवेंद्र्रसिंहराजे म्हणाले, ‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मिटणे आवश्यक आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण लवकर द्यावे. राज्य शासनाने मराठा समाजाची मागणी भक्कमपणे मांडली पाहिजे. ३ आॅक्टोबर रोजी होणाºया समाजाच्या बैठकीत आंदोलनाची नेमकी दिशा ठरेल. सर्वांनी संघटितपणे हा प्रश्न हाताळायला हवा. सरकारवर दबाव आणण्यासाठी जो काही निर्णय होईल, त्या पद्धतीने पुढची वाटचाल करू. सर्वांना एकत्रित आणण्यासाठी आमदार विनायक मेटे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे नेतृत्व कोणी करायचे वगैरे या प्रश्नाला दुय्यम महत्त्व आहे आणि समाजातील कोणीही त्याला फाटे फोडत बसू नये.’

 

News English Summary: Chhatrapati Udayan Raje Bhonsale and MLA Shivendra Raje Bhonsale should be present at the brainstorming meeting to be held on October 3 in Pune to take a firm stand on Maratha reservation. Shiv Sangram leader Vinayak Mete came to Satara and invited both the leaders. As both of them have accepted Mete’s invitation, Udayan Raje, Shivendra Raje and Mete have made a comeback.

News English Title: Satara Vinayak Mete met MP Udayan Raje Bhosale and MLA Shivendraraje Bhosale Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x