15 June 2021 10:25 PM
अँप डाउनलोड

कोरोनावरून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या नवनीत राणांनी स्वतः सर्व नियम पायदळी तुडवले

MP Navneet Rana Kaur, Corona Mask, Melghat, Amaravati

मुंबई, २९ मार्च: महाराष्ट्रातील परिस्थिती कोरोनामुळे नियंत्रणाबाहेर गेल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी लोकसभेत करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचं बेजवाबदारपणा पुन्हा समोर आला आहे. विशेष म्हणजे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनामुळे बिघडल्याने संपूर्ण परिस्थितीचा ताबा केंद्रानं घ्यावा अशी बोंब त्यांनी थेट लोकसभेत केली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः कोरोनाचा दुःखद अनुभव घेतला आहे. मात्र देशात आणि राज्यात परिस्थिती पुन्हा बिघडलेली असताना स्वतःच्याच मतदारसंघात बेजवाबदारपणे वागून इतरांचा देखील जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. सध्याच्या त्यांच्या राजकीय हालचाली आणि विषय केवळ भाजप पुरस्कृत असतात असा अनुभव अनेकांना पाहायला मिळतो आहे. मात्र एक बेजवाबदार लोकप्रतिनिधी म्हणून देखील त्या समोर येतं आहेत.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचे संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार मास्क घालण्याचे सरकारकडून आवाहन केले जात आहे. पण, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीच कोरोनाचे नियम पायदळी तुडवली आहे. मास्क न घालताच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत नृत्य केले आहे.

आज होळीचा सण सर्वत्र साजरा केला जातो आहे, यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवा सोबत होळी साजरी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पोहोचले आहे.

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मेळघाटात आदिवासींसोबत होळी खेळताना नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणांना मास्क घालण्याचा सपशेल विसर पडला. दुर्गम भागतेही असलेल्या मेळघाटात अनेकजण जण मास्क घालून होते. पण, खासदार नवनीत राणा यांनी कोरोनाचे नियमांची ‘होळी’ केली. मास्क न घालताच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत पारंपारिक नृत्यावर ठेका धरला.

तत्पूर्वी राणा दांपत्यानी मेळघाटातील गावात आदिवासी बालकांसोबत क्रिकेट खेळून मनसोक्त आनंद लुटला. यावेळी राणा दाम्पत्याने कोरोना नियम धाब्यावर बसवून ठेवले होते. दोघांनी तोंडाला मास्क बांधले नव्हते तर सोशल डिस्टसिंगचे यावेळी तीन तेरा वाजले होते. विशेष म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातल्या सदस्यानं सोबत,गर्दी टाळून होळी व धुळवड साजरा करण्याचे आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केल आहे.

 

News English Summary: As the situation in Maharashtra got out of control due to Corona, the irresponsibility of Navneet Rana Kaur, MP from Amravati, who had demanded the imposition of President’s rule, has come to the fore again. In particular, he had directly bombed the Lok Sabha demanding that the state should take control of the entire situation as the health system in the state was deteriorating due to corona.

News English Title: MP Navneet Rana Kaur never follow guidelines of corona during event at Melghat news updates.

हॅशटॅग्स

#Navneet Kaur Rana(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x