13 December 2024 8:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

गायिका वैशाली माडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश | विदर्भातील पक्षबांधणी

singer Vaishali Made, NCP Party, HInganghat, Vidarbha

मुंबई, २९ मार्च: लोकप्रिय गायिका वैशाली माडे आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. 31 मार्चला वैशाली मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार. वैशाली यांनी अनेक चित्रपटांत गाणी आणि मराठी मालिकांची ‘टायटल साँग’ देखील गायली आहेत.

मराठी बिग बॉसमुळे वैशाली माडे चर्चेत आल्या होत्या. त्यात त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्या पक्षप्रवेश करणार आहेत. गायिका वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत.

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्या पक्षप्रवेश करणार आहेत. गायिका वैशाली माडे या विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत. हिंगणघाट विधानसभेच्या जागेवर सध्या भाजपचे आमदार आहेत. ‘झी’ वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद वैशाली यांनी पटकावलं आहे. महाराष्ट्रासह देशभरात त्यांचे असंख्य फॅन्स आहेत, तर विदर्भातली असल्याने ती घराघरात परिचित असलेल्या चेहरा आहे. यासर्व गोष्टींचा फायदा राष्ट्रवादीला थेट निवडणुकीत होऊ शकतो.

 

News English Summary: Popular singer Vaishali Made will soon join the Nationalist Congress Party (NCP). On March 31, Vaishali will hoist the NCP flag at the NCP’s state office in Mumbai. Vaishali has also sung songs in many films and the title song of Marathi serials.

News English Title: Singer Vaishali Made will join NCP party news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x