11 December 2024 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Thiruchitrambalam Box Office | धनुषचा 'थिरुचित्रंबलम' चित्रपट परदेशात रचतोय इतिहास, कमाईचे आकडे पाहून व्हाल थक्क

Thiruchitrambalam box office

Thiruchitrambalam Box Office |  तमिळ भाषेतील रोमँटिक कॉमेडी ‘थिरुचित्रंबलम’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. दरम्यान, मिथुन जवाहर दिग्दर्शित या चित्रपटाने तामिळनाडूमध्ये 100 कोटींच्यावर कमाई केली तर, मुख्य भूमिकेमध्ये दिसून येत असलेल्या तमिळ सुपरस्टार धनुषच्या या चित्रपटानने ‘विक्रम’ आणि ‘बीस्ट’ला मागे टाकले आहे. तसेच यूएस बॉक्स ऑफिसवर 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा तमिळ चित्रपट बनला आहे.

धनुषचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला ‘थिरुचित्रम्बलम’ :
‘रांझणा’ या हिंदी चित्रपटापासूनच धनुषने त्याची छाप प्रेक्षकांवर पडायला सुरुवात केली, आणि आता धनुष फक्त दाक्षिणात्य चित्रपटापुरता मर्यादित राहिलेला नसून तो आता हॉलिवूडमध्येसुद्धा महत्वाच्या भूमिका करताना दिसून येत आहे. धनुषच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतील हा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे. धनुषच्या चित्रपटाने ₹100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

चाहत्यांकडून ब्लॉकबस्टर धनुषचे कौतुक :
धनुषचा ‘थिरुचित्रंबलम’ चित्रपट तामिळनाडूमधील अभिनेत्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून उदयास आला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तमिळनाडू मध्ये नाही तर सर्वत्र धनुषचे चित्रपट चाहते आवर्जून पाहतात आणि त्या चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देतात हे या ‘थिरुचिताम्बलम’ चित्रपटावरून समजलेच आहे. ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये नित्या मेनन, राशी खन्ना, प्रकाश राज, भारतीराजा आणि प्रिया भवानी शंकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

चित्रपटाची कमाई सुरुच :
चित्रपट रिलीज होऊन तीन आठवडे झाले आहेत तरी धनुषचा ‘थिरुचिताम्बलम’ चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. दरम्यान, धनुषच्या ‘थिरुचिताम्बलम’ चित्रपटाने कर्णन यांचे लाइफटाईम कलेक्शन देखील मागे टाकले आहे.

धनुषच्या हातामध्ये लागोपाठ चित्रपट,
तमिळनाडूला ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर धनुष हॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारताना दिसून येणार आहे. दरम्यान, नेटफ्लिक्स चित्रपट ‘द ग्रेमन’ नंतर धनुष दिसून आला आहे. धनुष आगामी तामिळ-तेलुगू ‘वाथी’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली असून, या चित्रपटाची तेलगू आवृत्तीचे नाव ‘सर’ असे असणार आहे. ‘वाथी’ या चित्रपटामध्ये धनुष प्रोफेसरच्या भुमिकेमध्ये दिसून येणार आहे तर हा चित्रपट तेलुगू इंडस्ट्रीतील डेब्यू चित्रपट असणार आहे. धनुष आणि त्याचे चाहते त्याच्या आगामी नाने वरुवेनच्या रिलीजचीही वाट पाहत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tiruchitambalam Box Office Earnings Checks details 2 September 2022

हॅशटॅग्स

Thiruchitrambalam box office(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x