22 September 2019 2:02 PM
अँप डाउनलोड

लबाड-लांडग-ढोंग-करतंय; पूरग्रस्तांच्या नावाने सोंग करतय: मनसेकडून राम कदमांची खिल्ली

MLA Ram Kadam, Dahi Handi, MNS ganesh chukkal

मुंबई : भाजप आमदार राम कदम यांनी यंदाची दहीहंडी रद्द केली आहे. राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे भाजपने घेतलेल्या निर्णयाला समर्थन देत राम कदम यांनी हा उत्सव साजरा न करण्याचे यावेळी ठरवले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र राम मदम यांनी खिल्ली उडवली आहे. गेल्या वर्षीच्या दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर नेटीजन्ससह विरोधकांनीही त्यांना चांगलेच धारेवर धरले होते.

त्याच पार्श्वभूमीवर मनसेने टीका करत राम कदम यांनी घाबरून यंदाची दहीहंडी रद्द केल्याचे म्हटले आहे. याबाबतचे एक पोस्टर त्यांनी बनवले असून मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी यांच्या नावाचे हे पोस्टर आहे. त्यामुळे लबाड लांडग ढोंग करतंय, पूरग्रस्तांच्या नावाने सोंग करतंय, अशी मिश्किल टीकाच या माध्यमातून केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मागील दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र यांनी देखील हजेरी लावत त्यांना कलियुगातील हनुमान अशी पदवी दिली आणि संध्याकाळी आमदार राम कदम यांच्यातील रावण जागृत झाला आणि महिलांबाबत संतापजनक वक्तव्य त्यांनी केलं होतं. देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती, इतकंच नव्हे तर भाजपने त्यांच्यापासून दूर राहणं पसंत केलं होतं.

विशेष म्हणजे राज्य दुष्काळात होरपळत असताना सत्ताधारी पक्षातील आमदार म्हणून ग्रामीण भागात जाण्याऐवजी हे आमदार राम कदम परदेशात थंडगार समुद्राच्या पाण्यावर पाहत पेय्य घेऊन आनंद लुटत होते. त्याच दुष्काळाच्या काळात विरोधक देखील ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर जाऊन दुष्काळाने होरपळलेल्या गावकरांना काही ना काही मदत करत होते. मात्र मागील वर्षी संतापजनक विधान केल्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुढील वर्षी दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात अनेक दहीहंडी मंडळांनी राम कदमांच्या दहीहंडीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय गेल्या वर्षीच घेतला होता. मात्र आता विषय पुन्हा वर येऊ शकतो या शंकेने त्यांनी यावर्षी सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत देण्याच्या बहाण्याने मार्केटिंग केली आहे. लोकांच्या विसरण्याच्या वृत्तीचा ते अचूक फायदा घेत आहेत, असंच म्हणावं लागेल.

२०१५-१६ साली पडलेल्या दुष्काळात महाराष्ट्र होरपळत असताना तसेच मुंबईमध्ये पाणी कपात जाहीर असतानाही पाण्याचे टँकर आणून फुल पाण्याची दहीहंडी या ‘चमकेश’ ने घाटकोपर मध्ये साजरी करून आपली हौस भागवून घेतली होती. अशा चमकेशने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर येथील पुरांचे कारण देऊन दहीहंडी रद्द करणे हे खरे कारण नसून या “चमकेश”चे दुखणे हे वेगळेच आहे.

गेल्या दहीहंडीच्या वेळेला ‘मुली पळून आणू’ अशी मुक्ताफळे उधळून कुप्रसिद्ध झाल्यामुळे या ‘चमकेश’ च्या दहीहंडी वर मुंबईतल्या गोविंदा पथकांनी बहिष्कार घातलेला आहे. ‘चमकेश’च्या दहीहंडीला कोणतेही पथक सलामी द्यायला फिरकणार नाही. तसेच मुली पळवुन आणू’ या वाक्याने चिडलेल्या महिला प्रचंड निदर्शने करतील आणि दहीहंडीत राडा होऊन जाईल म्हणूनच ‘चमकेश’ घाबरला आहे. गेल्या वेळच्या धसक्याने कोणताही सेलिब्रिटी व मुख्यमंत्र्यांसह कोणताही नेता दहीहंडीला येणार नाही याची खात्री “चमकेश”ला पटली आहे. एवढेच नव्हे तर ‘चमकेश’ च्या अनेक कारनाम्याने नाराज मिडीया त्याची चांगलीच वाजवणार याची त्याला माहिती होती आणि म्हणूनच “चमकेश”ने दहिहंडी रद्द केली. म्हणतात ना की हत्तीचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे….#गोWINदा असं म्हणत मनसेने आमदार राम कदमांचा भांडा फोड केला आहे.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#Ramdas Kadam(9)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या