6 October 2022 7:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Surya Rashi Parivartan | ज्योतिषशास्त्रानुसार येणारे 11 दिवस या राशींच्या लोकांसाठी वरदानासारखे असतील, सूर्य राशी परिवर्तनाचा परिणाम Trending Video | शिकार पाहिली आणि अजगराने झाडावर वेगाने चढत हल्ल्याची तयारी केली, व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल Penny Stocks | या शेअरने हजारो पटीत परतावा, 3 वर्षांत एक लाखावर 1 कोटी 25 लाखाचा परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा Horoscope Today | 07 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16' मध्ये इंस्टाग्राम फेम किली पॉलची होणार वाइल्ड कार्ड एण्ट्री, व्हिडीओ व्हायरल Multibagger Stocks | मागील दसऱ्याला या 44 शेअर्समध्ये लोकांनी पैसे गुंतवले, या दसऱ्याला मल्टिबॅगर परतावा मिळाला, स्टॉकची यादी सेव्ह करा Numerology Horoscope | 07 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या
x

मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका आम्हाला पटत नाही: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar, Raj Thackeray, MNS, Maharashtra Navnirman Sena, Maharashtra Vidhansabha Election 2019, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई: विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नसल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका पटत नसल्याचेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीदरम्यान मनसेला सोबत घेणार नाही. तसंच या निवडणुकांसाठी मुस्लीम समाजाचे 25 उमेदवार देणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. यापूर्वीही त्यांनी आपली मनसेसोबतची भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही राष्ट्रवादी आहोत. तसंच आम्ही मनसेसोबत जाणार नाही. आमचा दृष्टीकोन प्रादेशिकही नाही आणि धार्मिकही नसल्याचे ते म्हणाले होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिगणात प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी उतरला असून, येत्या दोन दिवसात आंबेडकर आपले उमेदवार जाहीर करणार आहेत. मात्र मनसेला सोबत घेणार नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबई ही मराठी माणसाची ही मनसेची भूमिका आपल्याला पटत नाही असे सांगत मनसेला सोबत घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच नेते चांगले असले तरी त्यांना सोबत घेणार नाही असे त्यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ने इतर पक्षांशी आघाडी करण्यासाठी कोणतेही दरवाजे बंद केले नाहीत आमचे दरवाजे खुले आहेत मात्र आता काँग्रेस सोबत आमचे जमणार नाही, असा युक्तिवाद देखील त्यांनी केला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x