21 April 2024 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ration Card Rules | तुमचा डीलरही कमी रेशन देतो का? फक्त हे काम करा, 1 दिवसात लाईनवर येईल IRCTC Railway General Ticket | रेल्वे जनरल तिकिटाचे हे खास नियम लक्षात ठेवा, अन्यथा तिकीट असूनही मोठा दंड भरावा लागेल EPF Passbook | पगारदारांनो! तुमची बेसिक सॅलरी 10,000 रुपये, वय 30 वर्षे, निवृत्तीनंतर तुम्हाला किती लाख रुपये मिळतील पहा ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना 'या' लाईटवर लक्ष ठेवा, अन्यथा खाते रिकामे होईल Baleno | मारुती बलेनो कार ठरतेय लोकांची खास पसंती! शोरूम'मध्ये बुकिंगला गर्दी, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! 670 टक्के परतावा देणारा शेअर आता अल्पावधीत 56% परतावा देईल
x

...अन्यथा युती तुटणार; खासदार संजय राऊतांकडून देखील दुजोरा

MP Sanjay Raut, Shivsena, BJP Shivsena Alliance, Maharashtra Vidhansabha Election 2019, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई: शिवसेना आणि भाजपच्या युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे भाजपा-शिवसेनेची युती तुटणार का, असा प्रश्नचिन्ह सर्वांसमोर असतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी युती तुटण्याचे संकेत दिले आहेत. जर शिवसेनेला २४४ पैकी १४४ जागा मिळाल्या नाही तर युती तुटू शकते, असे राऊत यांनी म्हटले आहे.

यापूर्वी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले होते की, शिवसेनेला विधानसभेसाठी १४४ जागा न मिळाल्यास युती तुटण्याची शक्यता आहे. आज त्यांचेच समर्थन करत राऊत म्हणाले, ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ५०-५० जागा वाटप फॉर्म्युल्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे दिवाकर रावते यांनी युती तुटण्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असूच शकत नाही.

यावेळी युतीबाबत विचारले असता राऊत यांनी आम्ही निवडणूक एकत्रच लढणार. का नाही एकत्र लढणार? असे सांगत युती होण्याची शक्यता अद्याप कायम असल्याचेही संकेत दिले. दरम्यान, दिवाकर रावते यांच्या विधानावरुन भाजपा मंत्री गिरीश महाजन यांनी ज्यांना युतीबाबत बोलण्याचा अधिकार नाही त्यांनी बोलू नये असं सांगत दिवाकर रावतेंवर टीका केली आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच युतीबाबत निश्चित सांगू शकतात. पण शिवसेना-भाजपा युती १०० टक्के होणारच असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x