19 March 2024 1:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TCS Share Price | टीसीएस शेअर्समध्ये मोठी घसरण सुरु, कंपनीच्या मोठ्या निर्णयाने शेअर पुढे किती घसरणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेटने शेअरवर परिणाम, शेअरची प्राईस खूप घसरणार? IPO GMP | स्वस्त IPO शेअरने लॉटरी लागली! एकदिवसात 101 टक्के परतावा मिळाला, गुंतवणूकदार मालामाल IRFC Vs RVNL Share Price | रेल्वे सेवा संबंधित शेअर्स खरेदी करावे? 1 वर्षात मल्टिबॅगर परतावा दिला, पण पुढे काय होणार? Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत Mutual Fund SIP | पगारदारांनो! महिना 3000 रुपयांची SIP बचत देईल कोटी मध्ये परतावा, रक्कम जाणून घ्या
x

गडकरी म्हणाले, अधिकाऱ्यांनो कामं करा अन्यथा लोकांकडून धुलाई; मग विरोधकांवर खटले का?

Central Minister Nitin Gadkari, Lazy Government officers

नागपूर : एमएसएमई सेक्टर मध्ये लघु उद्याेग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण हाेण्याची शक्यता आहे. आठ दिवसांमध्ये कामं पूर्ण केली नाहीत तर लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन अशी तंबी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या विधानामुळे नितिन गडकरी पून्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसेच आपण लालफितीच्या कारभराच्या विराेधात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

एमएसएमई सेक्टरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या लघु उद्याेग भारतीच्या कार्यक्रमाला गडकरी उपस्थित हाेते. यावेळी आपण अधिकाऱ्यांनी काम न केल्यास त्यांची लाेकांना सांगून धुलाई करु अशी तंबी दिल्याचे सांगितले. गडकरी म्हणाले, आज मी परिवहन कार्यालयात एक बैठक घेतली. ज्यात परिवहन आयुक्त सुद्धा उपस्थित हाेते. मी त्यांना म्हंटलं की तुम्ही आठ दिवसांच्या आत लाेकांच्या समस्या साेडवा अन्यथा लाेकांना कायदा हातात घ्यायला सांगून तुमची धुलाई करायला सांगिन. जी व्यवस्था न्याय देत नाही तिला आपण फेकून द्यायला हवं असं आपल्या शिक्षकांनी शिकवल्याचेही गडकरी पुढे म्हणाले.

आपल्याकडे लालफितीचा कारभार आहे. अनेक परिवहन निरीक्षक लाच घेतात. मी त्यांना सांगू इच्छीतो की तुम्ही सरकारी नोकर आहात आणि मी लोकांमधून निवडून आलोय. त्यामुळे मी लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे. जर तुम्ही चोरी करत असाल तर मी तुम्हाला एक चोर म्हणेन. उद्याजकांनी कोणतीही भीती मनात न ठेवता व्यवसाय करा, अधिकारी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत असंही गडकरी पुढे म्हणाले.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x