15 December 2024 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची राऊतांवर तिखट शब्दात टीका म्हणाले....

BJP MLA Gopichand Padalkar, Shivsena MP Sanjay Raut, Saamana Newspaper editorial

मुंबई, 18 डिसेंबर: सामनाच्या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख केला. त्यानंतर आता पडळकरांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पडळकर यांनी राऊतांना थेट पत्रच लिहिलं आहे. त्यात तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? असा प्रश्न विचारत अनेक मुद्द्यांवर राऊतांची कोंडी करण्याचा प्रयत्न पडळकरांनी केलाय. (BJP MLA Gopichand Padalkar criticize Shivsena MP Sanjay Raut)

“खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीनं आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे. प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे”, अशा शब्दात पडळकर यांनी राऊतांना खडे बोल सुनावले.

आपण सामनाच्या अग्रलेखात जी मुक्ताफळं उधळली आहेत ती मुद्दाम लोकांना कळावित म्हणून लिहित आहे. त्या अग्रलेखात आपण असे लिहिले की, ‘महाराष्ट्रात हुकूमशाही आणि आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलताशांसह तुरुंगात टाकले असते. पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे’.

त्याचसोबत शरद पवार यांच्याविषयी मध्यंतरी मी काही विधाने केली तेव्हा आपला चांगलाच जळफळाट झाला होता, ते साहजिकच आहे, कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत असे शिवसेनेतील आमचे मित्र आम्हाला सांगत असतात, माझ्यात सभ्यता आहे आणि अजूनतरी मी आपल्याबाबतीत सोडलेली नाही पण आपली एकूणच पवारांबाबतची हुजरेगिरी बघता आपल्याला तीच उपाधी मीदेखील द्यावी असे राहून वाटते असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

 

News English Summary: In the front page of the match, Shiv Sena MP Sanjay Raut mentioned BJP MLA Gopichand Padalkar as Fekuchand. Since then, Padalkar has launched a strong attack on Sanjay Raut. Padalkar has written a letter directly to Raut. How much is your salary, how much do you talk? Asking such a question, Padalkar has tried to confuse Raut on many issues.

News English Title: BJP MLA Gopichand Padalkar criticize Shivsena MP Sanjay Raut after Saamana Newspaper editorial news updates.

हॅशटॅग्स

#Saamana(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x