23 September 2021 6:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

देश मंदिर-मशीद, कलम ३७० मध्ये गुंतला; तर रोजगारा अभावी तरुणाच्या आत्महत्यांकडे डोळेझाक

Job, Unemployment, patur taluka, Commit Suicide

खेट्री (अकोला): मागील काही दिवसांपासून एक बाजूला देशभर मंदिर मशीद आणि कलम ३७० वरून वातावरण पेटत ठेवण्यात आलं आहे. मात्र दुसऱ्याबाजूला सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित असलेला रोजगार आणि भूकमारी याकडे पूर्णपणे कानाडोळा केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ गावखेडयताच नव्हे तर शहरात देखील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद होत असल्याच्या कारणाने सुशिक्षित तरुण देखील मोठ्या संख्येने रोजच्या रोज बेरोजगार होतो आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मात्र सत्ताधाऱ्यांचे समर्थक महत्वाच्या विषयांपेक्षा मंदिर-मशीद आणि कलम यावर समाज माध्यमांवर जाणीवपूर्वक वातावरण तापत ठेवत आहेत. अगदी जम्मू काश्मीरमध्ये एखादा सरकारचा प्रतिनिधि जाऊन जेवला तरी त्याला प्रमुख बातमी करण्यात येते आहे. जणू काही यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये लोकं आणि येणारे पर्यटक जेवतच नव्हते. त्याचं मूळ कारण दुसऱ्या बाजूची रोजगार आणि नोकऱ्यांसंबंधित उद्भवलेली गंभीर समस्या नजरेआड करता यावी अशीच योजना असावी. अगदीच काही नसलं तर केंद्रातील मंत्री रोज पाकिस्तानसबंधित एखादं विधान करतात आणि लोकांना त्यावर केंद्रित करतात. वास्तविक आर्थिक दृष्ट्या युद्ध ना पाकिस्तानला परवडणार ना भारताला हे ठाऊक असताना देखील चितावणीखोर विधानं केली जात आहेत.

दुसऱ्या बाजूला शहरात आणि गावखेड्यात बेरोजगारीमुळे भीषण समस्या उद्भवल्या आहेत. रोजगार मिळत नसल्याने नैराश्यापोटी पातुर तालुक्यातील चान्नी येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, १८ ऑगस्ट रोजी घडली. अमोल पवार (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चान्नी येथील अमोल पवार हा तरुण ट्रॅक्टर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या घरी शेती नसल्याने त्याचे वडील व अमोल पवार हे दोघे मजुरी करीत होते.

मात्र मागील काही दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे रोजगार मिळत नसल्याने अमोल पवार निराश झाला होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विंवचनेतच अमोलने आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे पाठविण्यात आला. अमोल पवार यांच्या वडिलांच्या फियार्दीवरून चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास चान्नी पोलिस करीत आहे. मृतकाच्या कुटुंबाला शासनाकडून मदत देण्याची मागणी गावातील ग्रामस्थांकडून होत आहे.

हॅशटॅग्स

#Maharashtra(202)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x