14 October 2019 2:06 PM
अँप डाउनलोड

कल्याण शहर घोषणेचे ६५०० कोटी ५ वर्ष वेटिंगवर; आता पूरग्रस्तांसाठी ६,८०० कोटींची घोषणा

Sangali Flood, Kolhapur Flood, CM Devendra Fadnvis

मुंबई : पूरग्रस्त भागांसाठी केंद्र सरकारने ६ हजार कोटींची मदत द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी दिली आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा एका भागाला एक भाग असेल. तर दुसरा भाग कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्राचा दुसरा भाग असेल. कोल्हापूर, सांगली, सातारा यासाठी ४७०० कोटी तर उर्वरित भागांसाठी २१०० कोटींची मदत मागितली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरसह कोकण, नाशिक व अन्य जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांसाठी राज्य सरकारनं आज सहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली. घरे, शाळा, रस्ते, जनावरे आणि पिकांसह सर्व प्रकारच्या नुकसानीची भरपाई या माध्यमातून करून दिली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 6 हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पिकांच्या नुकसानीसाठी २ हजार ८८ कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य आणि अतिरिक्त मनुष्यबळ ७५ कोटी, पडलेली घरे पूर्णपणे बांधून देणार आहोत, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५७६ कोटी रुपये देण्याचा निर्णय आहे. तर तात्पुरत्या छावण्यांसाठी २७ कोटी, जनावरांसाठी ३० कोटी, स्वच्छतेसाठी ७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(309)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या