14 December 2024 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

MPSC Updates | परीक्षा देणाऱ्यांसाठी मर्यादा | जाणून घ्या तुमच्या प्रवर्गातील मर्यादा

MPSC commission, limit on giving exams, competitive examination

मुंबई, ३० डिसेंबर: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आता राज्य सेवा आयोगाने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. यापुढे आता UPSC प्रमाणेच आता राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. खुल्या गटातून 6 तर ओबीसी गटातून फक्त 9 वेळा आता परीक्षा देता येणार आहे. (MPSC commission now limit for giving competitive examination)

राज्य लोकसेवा आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध करून महत्वाची घोषणा केली आहे. लोकसेवा आयोगातर्फे विविध शासकीय पदांसाठी निवड प्रक्रियांमध्ये सुधारणात्मक उपाययोजनांपैकी स्पर्धा परिक्षांमध्ये बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न अथवा संधीची संख्या आता मर्यादित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भाद आज परीपत्रक काढलं असून विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 6 वेळा ही परीक्षा देण्यात येईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या मर्यादेपासून सूट देण्यात आली आहे. तर, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 9 वेळा एमपीएससी परीक्षा देण्यात येईल. आयोगाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा अधिकची संधी घेतल्यास किंवा अधिकवेळा परीक्षा दिल्यास संबंधित विद्यार्थी किंवा उमेदवारास नोकरीचा लाभ मिळणार नाही.

विशेष म्हणजे उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या या नवी निर्णयाची अंमलबाजवणी ही 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्व स्पर्धांना लागू होणार आहे.

 

News English Summary: The Maharashtra Public Service Commission has issued a circular in this regard today and the maximum limit of examination has been fixed for the students. Accordingly, students in the open category will be given this test 6 times. Scheduled Caste and Scheduled Tribe students are exempted from the examination limit. So, students from other backward classes will be given MPSC exam 9 times. The concerned student or candidate will not get the benefit of the job if he / she takes more opportunities than the rules laid down by the commission or takes the exam more often.

News English Title: MPSC commission now limit for giving competitive examination news updates.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x