13 December 2024 3:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

पुण्यात व्हेंटिलेटर अभावी निवृत्त शास्त्रज्ञाचा COVID-19ने मृत्यू

Retired scientist dies, Covid19, Pune, Ventilator

पुणे १५ जुलै: पुण्यात कोरोना रुग्णांची सतत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्यव्यवस्था डळमळीत झाली आहे. याचाच फटका आज पुण्यातील एका शास्त्रज्ञाला बसला असून व्हेंटिलेटरअभावी त्यांचा मृत्यू झाला आहे. डॉ.पी.लक्ष्मी नरसिंहन (६१) असे त्यांचे नाव आहे.

पुण्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये डॉ.नरसिंहन हे वरिष्ठ शास्त्रज्ञ होते. काही वर्षांपूर्वी ते येथून निवृत्त झाले. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. पंरतु, व्हेंटिलेटर न मिळाल्याने त्या निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात त्यांची प्तनी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, पुणे विभागातील 31 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 18 हजार 196 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 654 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

पुणे जिल्ह्यातील 42 हजार 846 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 26 हजार 623 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 78 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 424 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.14 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के इतके आहे.

 

News English Summary: Corona patients are on the rise in Pune. As a result, the health system has been shaken. A scientist from Pune has been hit by this and has died due to lack of ventilator. Her name is Dr. P. Lakshmi Narasimhan (61).

News English Title: Retired scientist dies of Covid19 in Pune due to lack of ventilator News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x