17 November 2019 9:57 PM
अँप डाउनलोड

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंचा आज जन्मदिन

मुंबई : ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटापासून देशात चित्रपट उद्योगाची मुहुर्तमेढ रोवनारे आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंना आज जन्मदिना निमित्त गुगलकडून खास डुडल मानवंदना देण्यात आली.

दादासाहेब फाळके यांनी १९१३ रोजी पहिला भारतीय सिनेमा ‘राजा हरिश्चंद्र’ हा मूकपट जगासमोर आणला. दादासाहेब फाळके यांची चित्रपटनिर्मितीच्या अवघ्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ९५ सिनेमे आणि २६ लघुपटांची निर्मिती करून भारतीय चित्रपट श्रुष्टीला त्या काळातही एका उंचीवर घेऊन गेले. दादासाहेब फाळके हेच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात.

दादासाहेब फाळकेंचा जन्म १८७० साली झाला आणि मृत्य १९४४ रोजी झाला. मूळचे त्र्यंबकेश्वरचे असणारे फाळके यांनी त्याकाळात मोठ्या कष्टाने आणि अनेक अडचणींचा सामना करत १९१३ मध्ये पहिला भारतीय सिनेमा तयार केला होता. दादासाहेब फाळकेंनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर अनेक वर्ष त्यांनी छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुद्धा केला होता.

परंतु एकदा मुंबईत ‘लाईफ ऑफ ख्रिस्त’ हा मूकपट त्यांनी पहिला आणि तिथेच भारतीय चित्रपट निर्मिती करण्याच्या स्वप्नांना एक दिशा मिळाली. दादासाहेब फाळकेंच तेच स्वप्नं सत्यात उतरलं आणि १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय मूकपट प्रदर्शित झाला.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या