3 May 2024 12:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

गूगल मॅप लॉंच करणार नवीन फिचर 'थ्रीडी मॅप'

Google. Google Map, Google 3D Map, Youtube

मुंबई : कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर रस्ता माहित नसून सुद्धा आपण एका गोष्टीच्या भरवश्यावर बाहेर निघतो ते म्हणजे गूगल मॅप. या अँपमुळे गाडी थांबवून मग लोकांना विचारण्यापेक्षा या अँपने सांगितलेल्या दिशेने जाणे फारच सोईचे पडते. या अँपचा वापर वाढल्याने गुगल मॅप वापरकर्त्यांसाठी ऑगमेन्टेड रिएलिटी वॉकिंग डायरेक्शन हे नवीन फिचर लॉँच करणार आहे.

दरम्यान, या फीचरमुळे वापरकर्त्यांना स्ट्रीट व्हू उपलब्ध होणार असून यामुळे रस्ता शोधणं आता अधिक सोपं जाणार आहे. पुढील आठवड्यात हे फिचर सर्व स्मार्टफोन मध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रस्त्यावर चालताना कोणत्या ठिकाणी थांबायचं व कोणत्या दिशेने वळायचं हे आता थ्रीडी मॅप द्वारे आपल्याला कळणार आहे. यामुळे नक्कीच आपण योग्य रस्त्यावर आहोत ना हे कळणे सोपे जाणार आहे. मोबाईलचा कॅमरा सुरु असल्यानं तुमच्या आजूबाजूचा परिसराची गूगलला माहिती मिळणार आहे.

त्यानुसारच गूगल तुम्हाला रस्ता देखील सांगणार आहे. या अपडेट बरोबरच गुगल मॅप अन्य फीचर्स अपग्रेड करत आहे. रिजर्व्हेशन टॅब हे त्यातलाच एक फिचर आहे. या फीचरच्या मदतीने फ्लाईट्स आणि हॉटेलची महत्वाची माहिती तुम्ही सेव्ह करू शकता. विशेष म्हणजे हि माहिती तुम्ही ऑफलाईनहि पाहू शकता.

हॅशटॅग्स

#Google Report(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x