18 August 2019 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम काश्मीरबाबत पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु; सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित मी तिथे होती, दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीवेळी कन्हैय्या कुमार तेथे नव्हता: भाजप खासदाराची पत्नी सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत; आम्ही सरकारी धोरणात हस्तक्षेप करतो, पण...... बहुमताच्या जोरावर शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही: बच्चू कडू ‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
x

ट्रूकॉलरसारख्या अँपमुळे तुमचा डेटा आहे असुरक्षित

ट्रूकॉलरसारख्या अँपमुळे तुमचा डेटा आहे असुरक्षित

मुंबई : अनोळखी नंबरवरून येणारे कॉल किंवा कंपनीकडून येणारे कॉल ओळखण्यासाठी आपण ट्रूकॉलर किंवा ट्रॅपकॉलर सारखे अँप वापरतो. मात्र स्पॅम कॉल्स आणि रॉंग नंबर ओळखण्याबरोबरच हे अँप वापरकर्त्यांच्या डेटा चोरत असल्याचं उघड झालं आहे. एका अहवालानुसार असे अँप्स सुरु करताच वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीला धक्का पोचू शकतो. तसंच हे अँप वर्पारकर्त्यांचा डेटा थर्ड पार्टी कंपनीला विकत असल्याचं बोललं जात आहे.

एनसीसी ग्रुप या सायबर सिक्युरिटी कंपनीने काही अँप्सच परीक्षण केलं. यामध्ये ट्रॅपकॉल, ट्रूकॉलर आणि हिया हे अँपची चाचणी केली. या कंपनीने सादर केलेल्या अहवालात हे अँप्स वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीच उल्लंघन करत असल्याचं समोर आलं आहे. ट्रूकॉलर आणि हिया सारखेच अँप्स वापरकर्त्यानी प्रायव्हसी पॉलिसीबाबत परवानगी देण्याआधीच डिव्हाईस डेटा अपलोड करतात.

यामध्ये डिव्हाईस टाईप, मॉडेल आणि सॉफ्टवेअरची माहिती असते. एनसीसी ग्रुपने या अँपच्या कंपनीसोबत संपर्क साधल्यानंतर ह्या अँपनी ट्रॅपकॉल पॉलिसी अपडेट केली आहे. ट्रूकॉलरने यावर उपाय शोधून या पुढे असं होणार नसल्यच सांगितलं आहे. तरीही वापरकर्त्यानी विचार करूनच या अँप्स चा उपयोग करावा हि विनंती.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#gadgets(13)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या