26 April 2024 9:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मुंबईत कोरोनामुळे झालेले ९५० मृत्यू दडवून का ठेवले; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Covid 19 Death, Mumbai, ICMR

मुंबई, १५ जून: आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून अधिक करोना मृत्यू का दडविण्यात आले ? इतके अक्षम्य दुर्लक्ष का ? आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार ? असे सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्र लिहिले आहे.

“आयसीएमआरच्या गाइडलाईन्स डावलून महापालिकेच्या समितीने करोनामुळे झालेले मृत्यू हे करोनाचे नाहीत, असे दर्शविले होते. आता आयसीएमआरकडून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तपासणी करून ३५६ अपात्र ठरवलेले करोना मृत्यू आणि काही तपासणीसाठी प्रलंबित ठेवलेली प्रकरणे असे मिळून सुमारे ४५१ मृत्यू हे कोविड मृत्यू आहेत आणि आता ते पोर्टलवर तत्काळ नोंदविले गेले पाहिजे. आयसीएमआरचे स्पष्ट दिशानिर्देश असताना आणि करोनामुळे मृत्यू झालेले असताना सुद्धा ते करोना मृत्यू नाहीत, हे ठरविण्याचा अधिकार समितीला दिला कुणी? कोणते मृत्यू हे करोना मृत्यू नाहीत, याबाबत तीन वर्गवारी स्पष्टपणे आयसीएमआरने दिल्या आहेत. पण, येथे मनात येईल, त्याप्रमाणे करोनाचे मृत्यू करोना नसल्याचे ठरविण्यात आले आहे. ही बाब केवळ अक्षम्य दुर्लक्षाचीच नसून गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात मोडणारी आहे, हे मला दुर्दैवाने नमूद करावे वाटते”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यानच्या काळात सुमारे ४५१ अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असे सारेच प्रश्न निर्माण होत आहेत.

आता ही बाब उघडकीस आल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी एक पत्र शासनाने पाठविले असून, त्यात कोरोनासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी अपडेट करायची आहे, ती तातडीने पाठवा, असे त्यात म्हटले आहे. असे करून झालेला प्रकार जाणूनबुजून लपविण्याचा दुबळा प्रयत्न होताना दिसून येतो आहे. याबाबत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. आयसीएमआरच्या गाईडलाईन्स डावलून महापालिकेच्या समितीने कोरोनामुळे झालेले मृत्यू हे कोरोनाचे नाहीत, असे दर्शविले होते.

 

News English Summary: Why more than 950 corona deaths in Mumbai were suppressed without following ICMR guidelines? Why such unforgivable neglect? And what action will the state government take against those who do so? Such questions have been raised by former Chief Minister and Leader of Opposition in the Legislative Assembly Devendra Fadnavis.

News English Title: Coronavirus Lockdown opposition leader Devendra Fadanvis Letter To CM Uddhav Thackeray Over Corona Deaths In Mumbai News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x