12 December 2024 3:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

आज पुणे शहारात २४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, १० रुग्णांचा मृत्यू

242 new corona, covid 19 patients, Pune city

पुणे, २९ मे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस राज्यात अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं करोनाबाधितांच्या संख्येत सर्वात पुढे दिसत आहेत. आज दिवसभरात पुणे शहारात २४२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले तर दहा जणांचा करोनाने बळी घेतला.

शहरातली करोनाबाधितांची एकूण संख्या आता ६ हजार ९३ एवढी झाली आहे. तर आज पर्यंत करोनामुळे ३०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आज उपचार घेत असलेल्या १८६ रुग्णांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर ३ हजार ४५० रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.

दुसरीकडे मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आज ४१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मात्र याच परिसरात आज कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्या आकडेवारीनुसार आता एकूण रुग्णांचा आकडा १७१५ वर पोहोचला आहे.

 

News English Summary: It is increasing in the state. Mumbai and Pune are the two major cities with the highest number of coroners. During the day, 242 new coronary artery disease patients were found in Pune city and ten people were killed by corona.

News English Title: Today 242 new corona covid 19 patients found in Pune city News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x