14 December 2024 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

आज राज्यात २६८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर ११६ मृत्यू

Maharashtra, Covid 19

मुंबई, २९ मे : महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २६८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११६ मृत्यू झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ८ हजार ३८१ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासात आलेल्या संख्येनंतर आता महाराष्ट्रातील करोना रुग्णांची ६२ हजार २२८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्याच्या घडीला ३३ हजार १२४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस राज्यात अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं करोनाबाधितांच्या संख्येत सर्वात पुढे दिसत आहेत. आज दिवसभरात पुणे शहारात २४२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले तर दहा जणांचा कोरोनाने बळी घेतला.

शहरातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ६ हजार ९३ एवढी झाली आहे. तर आज पर्यंत कोरोनामुळे ३०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आज उपचार घेत असलेल्या १८६ रुग्णांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर ३ हजार ४५० रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.

दुसरीकडे मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आज ४१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मात्र याच परिसरात आज कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्या आकडेवारीनुसार आता एकूण रुग्णांचा आकडा १७१५ वर पोहोचला आहे.

 

News English Summary: In the last 24 hours, 2682 new patients have been registered in Maharashtra. While 116 have died. In the last 24 hours, 8,381 patients have been cured. After the last 24 hours, the number of corona patients in Maharashtra has risen to 62,228.

News English Title: In the last 24 hours 2682 new patients have been registered in Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x