15 December 2024 4:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

CM Uddhav Thackeray Aurangabad Tour | मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला मनसेही विरोध करणार

CM Uddhav Thackeray

औरंगाबाद, १६ सप्टेंबर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता विरोध वाढताना दिसतोय. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही विरोध केलाय. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्याला आता विरोध वाढताना दिसतोय.

CM Uddhav Thackeray Aurangabad Tour, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला मनसेही विरोध करणार – MNS party will opposes CM Uddhav Thackeray during Aurangabad tour :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी मनसेनंही दंड थोपटले आहेत. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं पाणी पुरवठा योजनेत औरंगाबादकरांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेनं केलाय. मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे आणि सुमित खांबेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

एमआयएम लावणार उपरोधिक बॅनर:
मुख्यमंत्री ज्या विमातळावर उतरणार आहेत, त्या विमानतळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत एमआयएमतर्फे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी एमआयएमचे कार्यकर्ते ठाकरे यांच्याविरोधात धन्यवादचे उपरोधिक बॅनर घेऊन उभे राहणार आहेत. तसेच शहराच्या न झालेल्या विकासाबद्दल धन्यवाद असे म्हणत एमआयएमतर्फे ठाकरे तथा राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली जाण्याचीही शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: MNS party will opposes CM Uddhav Thackeray during Aurangabad tour.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x