26 April 2024 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अब्दुल सत्तारां'सारख्या उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी: राजू शेट्टी

Minister Abdul Sattar, Former MP Raju Shetty, Minister Bachhu Kadu, CM Uddhav Thackeray

बुलडाणा: महाविकासआघाडी सरकारने केलेल्या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीसंदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा सल्ला देणा-या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांमध्ये जाऊन ते काय म्हणतात हे जाणून घ्यावे. सोबतच अशा उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्यमंत्री बच्चू कडू यांची भूमिका योग्य आहे. घोषित कर्जमाफी योजनेत केवळ १५ ते २० टक्के शेतक-यांचा लाभ होत असून सप्टेंबर २०१९ नंतरचे शेतकरी त्यास पात्र नाहीत. वास्तविक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. चालू हंगामात शेतक-यांनी घेतलेले पीक कर्ज हे जूनमध्ये थकित होईल. आपत्तीमुळे शेतक-यांचे पीकच अस्तित्वात नाही. त्यामुळे या शेतक-यांची कर्जमाफी झाल्यास त्यांना दिलासा मिळले. पीक कर्ज एक वर्षासाठी सहा टक्के सवलतीच्या दरात मिळते. त्यानंतर त्यावर १२ टक्के व्याज लागते. त्यामुळे मुद्दलापेक्षा शेतक-यांचे व्याज अधिक होत असल्याने शेतक-यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांची भूमिका योग्य असल्याचे ते म्हणाले.

तत्पूर्वी, २ लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं आहे, असं वक्तव्य महाविकास आघाडी सरकारचे राज्य मंत्री बच्चू यांनी केलं होते. पुण्याच्या आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. तेव्हा ते पत्रकारांशी संवाद साधला होता. तूर डाळीला हमीभाव देणं आणि ते जाहीर करणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण केंद्र ते काम करत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर आसूड ओढले होते. पुढे त्यांनी शेतकऱ्यांना २ लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणं असल्याचं म्हणत आपल्याच महाविकास आघाडी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते.

यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, कायद्यावर कायदे येत आहेत पण शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा मात्र हे केंद्र सरकार आणू शकत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला उद्देशून म्हणताना हिंदुत्व सोडलं नसेल तर ते एनआरसीला समर्थन करतील, असं वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना बच्चू कडूंनी राज्यातील प्रश्नांचे प्राधान्यक्रम ठरवण्याचा सल्ला भारतीय जनता पक्षाला दिला होता.

मात्र मंत्री पदी विराजमान होऊन देखील बच्चू कडू शेतकरी प्रश्नांवरून ते ठाकरे सरकारला देखील प्रश्न विचारात असल्याने ठाकरे सरकारमधील दुसरे राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडू यांना थेट राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता. अब्दुल सत्तार म्हणाले होते की, मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा ८० टक्के फायदा होणार आहे. तसेच ही कर्जमाफीअंतिम नसून, हा पहिला टप्पा आहे. शासनाच्या तिजोरीत जसा-जसा पैसा येईल तसे शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि कर्जमाफीबद्दल निर्णय घेतली जाणार आहे. मात्र असे असूनही, बच्चू कडू ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारची कर्जमाफी त्यांना बुजगावणं असल्याचं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा खोचक सल्ला सत्तार यांनी दिला होता.

 

Web Title:  Chief Minster Uddhav Thackeray should take action on Minister Abdul Sattar says former MP Raju Shetty.

हॅशटॅग्स

#Raju Shetty(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x