26 April 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली
x

MPSC विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये | संभाजी ब्रिगेड परीक्षा केंद्रांना संरक्षण देईल - प्रवीण गायकवाड

MPSC Prelim exam 2020, Maratha reservation, Praveen Gaikwad, Sambhaji Brigade

पुणे, ९ ऑक्टोबर : सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी करत संभाजी ब्रिगेड परीक्षा केंद्रांना संरक्षण देईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

जोपर्य़ंत मराठा आरक्षण मिळत नाही आणि यावर तोडगा निघत नाही. तोपर्यंत पोलीस भरती रद्द करावी आणि एमपीएससी परीक्षा घेऊ नये, अशी मराठा समाजाकडून मागणी होत आहे. दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्यात यावी, असे आवाहन केले आहे. आम्ही अभ्यास केला आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, आमचे वर्ष वाया जाईल, असे सांगत परीक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आजपासून मराठा आरक्षणासाठी ठोक मोर्चाची सुरुवात तुळजापुरात आई तुळजाभवानीच्या दर्शनाने झाली…या मोर्चाला खासदार संभाजीराजे भोसले उपस्थित आहेत. सकाळपासूनच उस्मानाबाद जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मराठा बांधव तुळजापुरात जमायला सुरवात झाली. यापार्श्वभूमीवर तुळजापुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उस्मानाबादमध्ये मराठा समाज आक्रमक झालेला दिसून येतोय, ठोक मोर्चाला सुरवात झाली.

दुसरीकडे, आम्हाला गृहित धरू नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका. वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढू असं वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत असं दिसून येतं आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयही नाही असाही आरोप संभाजी राजेंनी केला आहे. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका. आम्ही दिल्लीला येण्यासाठीही घाबरणार नाही अशा शब्दात केंद्र सरकारने राज्य व केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. राज्यात होणारी आंदोलनं ही भाजपा पुरस्कृत नाहीत असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: Praveen Gaikwad, state president of Sambhaji Brigade, has said that it is not appropriate to hold students hostage in order to hold the government hostage. He was speaking at a press conference in Pune. He also demanded that the examinations be held as per the schedule and said that the Sambhaji Brigade would provide protection to the examination centers.

News English Title: MPSC Prelim exam 2020 Maratha reservation it is not appropriate to hold students hostage Sambhaji Brigade Praveen Gaikwad Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x