4 December 2024 11:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

सब 'जाणकर' भी? जानकर म्हणतात बारामती मीच जिंकणार

बारामती : आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष भाजपकडे लोकसभेच्या ६ आणि विधानसभेच्या ५० जागा मागणार असून, आमचं ध्येय राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला सत्तेपासून रोखाने हेच ध्येय असल्याचे महादेव जानकर म्हणाले. यंदा बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि बारामतीची निवडणूक सुद्धा मीच जिंकणार असं सुद्धा महादेव जानकर म्हणाले.

बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत विधान करताना म्हटलं की, मला माढा मतदारसंघ मागच्या वेळीच हवा होता. परंतु राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या दोघांनी स्वतःच्या पक्षाचे हित साधत आमच्याविरुद्ध षड्‌यंत्र रचून स्वतःकडे तो मतदारसंघ घेतला. पुढे ते म्हणाले की, माझं बारामतीतूनच निवडणूक लढविण्याला प्राधान्य असेल असं ते म्हणाले.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती. आता त्यांनी पुन्हा बारामतीतून निवडणूक लढविण्याचा मानस बोलून दाखविला आहे. परंतु चर्चे दरम्यान पत्रकारांनी धनगर समाजाच्या आरक्षासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी,’कमिटी नेमली असल्याचे सांगत तो अहवाल सकारात्मक येईल त्यावेळी सरकार नक्कीच आरक्षण लागू करेल असं जानकर म्हणाले.

पुढे चर्चे दरम्यान जानकरांनी एक दावा केला कि, मी सत्तेत आलो असलो तरी ते एकट्या धनगर समाजाच्या बळावर नाही आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतची प्रक्रिया सुरू असून धनगर समाजाच्या युवकांनी संयमाने घ्यायला हवं असं ते म्हणाले.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x