भाजप-सेनेच्या सरकारमुळे नाही, तर मनसेमुळे मुंबईत पेट्रोलचे भाव ४ रुपयांनी कमी

मुंबई : काही महिन्यांपासून संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असून, त्यामुळे महागाईत सुद्धा प्रचंड वाढ झाल्याने सामान्यांची चांगलीच दमछाक होत आहे. केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पेट्रोलचे भाव कमी करण शक्य नसल्याचे म्हटले असताना राज ठाकरेंच्या मनसेकडून मुंबईकरांना एका दिवसाचा का होईना, पण दिलासा देण्याचा प्रयत्नं करण्यात आला असून त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेने भाजप-शिवसेनेच्या सरकारला सुद्धा एक अप्रत्यक्ष चपराक देण्याचा प्रयत्नं केला आहे.
१४ जून हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्मदिन असल्याने मनसेकडून मुंबईतल्या तब्बल ३६ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ४ रुपयांची सूट दिली जाणार आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना पेट्रोलच्या भडकलेल्या किंमतीतून एका दिवसाचा का होईना पण दिलासा मिळणार आहे.
मनसेकडून मुंबईमध्ये ते मोठ्या प्रमाणावर केलं जाणार असलं तरी राज्यभरात अनेक ठिकाणी मनसेकडून राज्यातील ठिकाणी हा एका दिवसाचा अनोखा उपक्रम राबविला जात असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर भाखळ्यातील विकी हॉटेलसमोरील पेट्रोलपंपावर तब्बल ९ रुपये स्वस्त दराने दुचाकीस्वारांना पेट्रोलवाटप करण्यात येणार आहे. भायखळा विधानसभेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.भाजप शिवसेना सरकारच्या कार्यकाळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली असून, त्याविरोधात मनसेने आंदोलन सुद्धा छेडलं होत.
मनसेने अप्रत्यक्षरित्या भाजप आणि शिवसेना सरकार पेट्रोल डिझेलच्या किंमती घटविण्यास सक्षम नसून, त्यांच्याच कार्यकाळात महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढतच असल्याचा संदेश देण्याचा काम या अनोख्या उपक्रमातून केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?
-
Multibagger Stocks | हे स्टॉक्स गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत, हजाराचे कोटी करणाऱ्या शेअर्सची यादी सेव्ह करा
-
Weekly Numerology Horoscope | या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींना येत्या आठवड्यात आनंदाची बातमी, धनलाभाचे प्रबळ योग-लाभ
-
Viral Video | त्याचा वेगाने येणाऱ्या कारच्या धडकेने मोठा अपघात होतो, नंतर जे घडलं ते पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही
-
Viral Video | त्या लहान मुलांसोबत स्लाइडिंग स्विंगवर खेळू लागल्या, नंतर जे घडलं त्यावर कोणालाही हसू आवरता आलं नाही
-
हर घर महंगाई | ज्या महागाई - बेरोजगारीच्या मुद्द्यामुळे मोदी सरकार सत्तेत, तेच मुद्दे 2024 भाजपाला भोवणार?
-
Bihar Govt | भाजप अजून एका सहकारी पक्षाला संपवण्याच्या तयारीत?, नितीश कुमारांनी JDU आमदार-खासदारांची बैठक बोलावली
-
राज्यात भाजपचं लोकसभा मिशन 48 | शिंदे गट भाजपात विलीन होणार किंवा राजकीय विश्वासघात होणार? | दानवेंच्या विधानाने खळबळ
-
5G Spectrum Auction Scam | 5G स्पेक्ट्रम लिलावात महाकाय घोटाळा झाला?, दाक्षिणात्य नेते आक्रमक, वरिष्ठ पत्रकारांचं ट्विट
-
Amazon Great Freedom Festival 2022 | अॅमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, गॅझेट्स अत्यंत स्वस्त