राज्यात खासगी एजन्सीद्वारे नोकर भरती; आ. रोहित पवारांची तीव्र नाराजी
मुंबई: तत्कालीन फडणवीस सरकारने राज्याच्या स्थितीचा अंदाज घेऊन ७२ हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्यातील तब्बल ३४ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलमार्फत अर्ज केले. मात्र त्यानंतर सर्वकाही ठप्प झालं आणि त्यात निरनिराळ्या निवडणुका लागल्याने प्रक्रिया अधिकच लांबली होती. मात्र सरकारकडे फीच्या मार्फत तब्बल १३० कोटी पेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या निर्णय घेतला होता आणि नव्याने तयारी सुरु केली होती.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार महाआयटी’तर्फे शासकीय महाभरतीसाठी सक्षम अशा खाजगी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसात निविदा प्रसिद्ध केली जाणार असून १५ एप्रिलपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, सामान्य प्रशासनाकडून शासकीय महाभरती कशी राबवायची याबाबत परिपूर्ण परिपत्रक निघेल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून मेगाभरतीला सुरुवात होईल. महाविकास आघाडी सरकारने खाजगी एजन्सीच्या मार्फत भरती करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “राज्यात खासगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्याचा घाट घालून तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा करण्याचा प्रकार मंत्र्यांची दिशाभूल करण्याच्या काही अधिकाऱ्यांच्या खेळामुळे होत आहे. केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्ट्राला ते का शक्य होऊ नये? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित करून राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील संशय व्यक्त केला आहे.
राज्यात खासगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्याचा घाट घालून तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा करण्याचा प्रकार मंत्र्यांची दिशाभूल करण्याच्या काही अधिकाऱ्यांच्या खेळामुळे होत आहे.
केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्ट्राला ते का शक्य होऊ नये? pic.twitter.com/eyATR3tSbI
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 11, 2020
News English Summery: According to the directive of the State Government, the private agency capable of governing Maha Bharati will be appointed by MahaIT. The tender will be released in two days and all the process will be completed by April 15. In the meantime, a complete circular will be issued by the General Administration about how to implement the Government Mahabharata. The mega-recruitment will begin from the third week of April. NCP MLA Rohit Pawar has expressed his displeasure over the decision taken by the Alliance for Development through a private agency. MLA Rohit Pawar has tweeted, “Some officials are misleading the way ministers recruit employees through private agencies in the state. He raised such a direct question by the states Administrative officials have also expressed doubt.
Web News Title: Story NCP MLA Rohit Pawar opposed appointing private agency to fill vacant seats in Maharashtra government .
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News